crime news : मुसळी फाट्याजवळ कापूस व्यापाऱ्याला लुटले : दीड कोटीची रक्कम लंपास

 crime news  : धरणगाव : जळगावहून धरणगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुसळी गावाजवळील फाट्यावर कापुस व्यापाऱ्याला अज्ञात चोरट्यानी लुटून सुमारे दीड कोटीची रक्कम हातोहात लंपास केली.

 

धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील  दुर्गेश हे जिनींगचे पेमेंट 1 कोटी 60 लाख रोकड घेवून जळगावहून पिंप्रीला कारने जात होते. निलॉन्स कंपनीजवळील उड्डाण पुलाजवळ त्यांची कार येताच स्कारपिओ कारमधुन आललेल्या तिघांनी त्यांची गाडी अडवून धमकावत त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावून पळून गेले.

याबाबत धरणगाव पोलीस व एलसीबीचे पथक घटनास्थळी पोहचेले असून तपास सुरू केला आहे.

 

 अशी केली लुट

याबाबत अधिक माहिती घेतली असता निलॉन्स कंपनीसमोरील उड्डाणपुलाच्या खाली दुर्गेश यांची कार येताच समोरून येणाऱ्या बोलेरो कारने त्यांना समोरून धडक दिली. त्यामुळे कारचे चाक पंचर झाले. या गोंधळात स्कारपीओतील तीघांनी कारमध्ये घुसत पैशांची बॅग घेवून पळ काढला. काय घडतय हे लक्ष्ाात येईपर्यंत चोरट्यांनी तेथेन पलायन केले होते. विशेष म्हणजे त्यांनी स्कारपीओ कार तेथेच सोडून पळाले.