Crime News : प्रेमासाठी लोक काहीपण करायला तयार होतात. अश्यातच एक बातमी समोर आली आहे, सोनगीर फाट्याजवळ एकाने शिक्षिकेसह तिच्या मुलीच्या अंगावर कार घालत धडक देत खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे, एकावर सोनगीर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार,शिक्षिकेने लग्नास नकार दिल्याच्या रागातून हा प्रकार घडला. ही घटना सव्वापाच ते सहा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत शिक्षिका दिप्तिका सुधाकर शेगावकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्या मुलगी वैष्णवी हिच्यासह मंगळवारी पहाटे सव्वापाच ते सहा वाजेदरम्यान सोनगीर फाट्याजवळील हॉटेल स्वागतजवळ थांबलेले होते. तेव्हा दिप्तिका शेगावकर हिने अहमदाबाद येथील एकास लग्नास नकार दिल्याचा राग आल्याने त्याने त्याच्या ताब्यातील डीडी ०३ के ३०६५ क्रमांकाची कार भरधाव वेगाने चालवून शिक्षिकेसह तिच्या मुलीच्या अंगावर घालून धडक दिली. त्यात दोघी जखमी झाल्या. तसेच मुलगी वैष्णवी हिचा गळा दाबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजय चौरे करीत आहेत. दरम्यान, या धक्कादायक प्रकाराने समाजमन सुन्न झाले असून संबंधितांना कडक शासन करावे, इतर दोषींनाही तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी जोर धरून आहे.