देशात सध्या लव्ह जिहादच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. देशासह राज्यातील अनेक तरुणी या लव्ह जिहादला बळी पडत आहे. या प्रकरणांमध्ये अनेक तरुणींना धर्मांतरण करावे लागले आहे तर काही तरुणींना आपला जीव गमवावा लागला आहे. अशीच काहीशी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. या ठिकाणी एका नराधमाने तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्या सोबत असं काही केलं की, वाचून तुमच्याही अंगावर काटा येईल.
छत्रपती संभाजीनगर शहरामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे प्रियकरानेच आपल्या प्रियेसीची निर्घृणपणे हत्या केली आहे.या घटनेने शहरात एकाच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सचा तिच्या प्रियकरानेच खून केला आहे. हत्या झालेल्या युवतीचे नाव मोनिका सुमित निर्मळ आहे. जालना येथे राहत असलेली मोनिका कामानिमित्त दरोरोज छत्रपती संभाजीनगर येथे ये-जा करीत होती. ती आपली दुचाकी शहरातील रेल्वे स्टेशन येथे लावत असे. पार्किंगच्या निमित्ताने तिची ओळख आरोपी इरफान याच्याशी झाली.
याच ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि पुढे जाऊन प्रेमात झाले. हे संबंध गेल्या वर्षभरापासून चालू होते. प्रेम संबंधातून आरोपीचे आणि मोनिकाच्या भेटीगाठीही चालू असे. महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात मोनिका हि नर्स म्हणून कार्यरत होती. नेहमीप्रमाणे मोनिका ६ फेब्रुवारी रोजी ड्युटीसाठी संभाजीनगरला गेली, परंतु रात्री उशिरा ती घरी परतली नाही. आपली मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांना चिंता वाटू लागली. त्यामुळे तिच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हेही वाचा : धक्कादायक ! चार महिन्यांपूर्वीच मिळाली नोकरी अन् अपघातात संपले नव्या भविष्याची स्वप्ने, १ ९ वर्षीय पोस्टमास्तरचा दुर्दैवी मृत्यू
तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. ६ फेब्रुवारी रोजी तो मोनिकाला लासुर स्टेशन येथील आपल्या शेतात भेटण्यासाठी घेऊन गेला. त्यानंतर त्याने मोनिकाच्या हत्या करून तिचा मृतदेह शेतातल्या एका पडक्या खोलीत पुरून टाकल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांना सांगितला.
याप्रकरणी आता पोलीस पुढील तपास करीत आहे. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ परिसरात पसरली आहे.या निर्घृण हत्येने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिस अधिक तपास करून या प्रकरणाचा अधिक खुलासा करतील, अशी माहिती देण्यात आली आहे.