---Advertisement---

Crime News : दुकानातून तांब्याची वायर चोरणारे चौघे पोलिसांच्या जाळ्यात

by team
---Advertisement---

वरणगाव : मोटर रिवाइंडिंगच्या दुकानातून तांब्याची वायर चोरी केल्याची घटना तळवेल येथे घडली होती. याप्रकरणी वरणगाव पोलिस स्टेशनला पुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

तळवेल येथे सुनिल अशोक पाटील यांचे रिवाइंडिंग चे दुकान आहे. ते शुक्रवार १६ रोजी दुकान बंद करुन घरी गेले. शनिवारी १७ रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानाचे कुलूप उघडे असल्याचे त्यांच्या भावाने सांगितले असता ते दुकानात पोहचले.  तेव्हा त्यांच्या दुकानातून ६० हजार रुपये किमतीची कॉपर वायरची चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

या चोरी प्रकरणी  सुनील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपास कामी सपोनि भरत चौधरी, ए. एस. आय. श्रावण जवरे, पो. हे.कॉ. प्रमोद कंखरे, पो. कॉ. मनोज म्हस्के, पो.को. फिरोज पठाण, पो.को. सचिन गुमळकर यांनी तातडीने तपास चक्र फिरवुन संशयित अविनाश सुरवाडे, अजय सुरवाडे, प्रज्ञेश उर्फ जितू सुरवाडे, सुमित सुरवाडे सर्व राहणार तळवेल यांना ताब्यात घेतले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment