Crime News: जमिनीच्या वादातून पुतण्याने आपल्या काका काकूंची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन वर्षांपासून सुरु असलेल्या जमिनीच्या वादाचा शेवट पुतण्याने काका काकूंची हत्या करून केला आहे. या दुहेरी हत्याकांडाने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पुतण्याला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, थडियस कुल्लू आणि त्याची पत्नी सिल्व्हिया कुल्लू हे आपल्या घरात बसले होते. यावेळी त्यांचा पुतण्या अरविंद कुल्लू हा तिथे आला. दोन वर्षांपासून चालू असलेल्या जमिनीच्या वादावरून त्याने थडियस कुल्लू यास शिवीगाळ करू लागला. यानंतर दोघांत किरकोळ वाद सुरु झाला. या वादातून अरविंद याने काका थडियस कुल्लू यांच्यावर धारदार कुऱ्हाडीने सपासप वार करण्यास सुरुवात केली. यासोबतच अरविंद याने काकू सिल्व्हिया कुल्लू यांच्यावरही वार केले. आरोपीने दोघांच्या मानेवर आणि शरीराच्या अनेक भागांवर वार केले. केलेले वार इतके गंभीर होते की यात थडियस कुल्लू आणि सिल्व्हिया कुल्लू यांचा जागीच मृत्यू झाला. हत्या करून आरोपी अरविंद हा घटनास्थळावरून पसार झाला.
या दुहेरी हत्याकांडाची बातमी वणव्यासारखी संपूर्ण गावात पसरली. यामुळे गावात एकच खडबळ उडाली. गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना संबंधित घटनेबद्दल माहिती दिली. माहिती मिळताच कामदरा पोलिसांनी घटनस्थळ गाठले.पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रवाना केला. यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
दोन वर्षांपासून सुरू होता जमिनीचा वाद
झारखंड मधील गुमला क्षेत्रातील करिचुवा अंबाटोली गावात राहणारे थडियस कुल्लू यांचा पुतण्या अरविंद कुल्लू याच्यासोबत दोन वर्षांपासून जमिनीचा वाद सुरु होता. याबाबत गावातील पंचायतीत अनेक वेळा चर्चा झाली, परंतु त्यावर तोडगा निघू शकला नाही. जमिनीचा हा वाद विकोप्याला जाऊन पुतण्याने काका-काकूची निर्घृण हत्या केल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली.