---Advertisement---

Crime News : धडगावमध्ये १० लाख ८० हजारांचा गांजा जप्त; दोघांना अटक

---Advertisement---

Crime News : नंदुरबार येथील स्थानिक गुन्हे शाखा आणि धडगाव येथील पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत सुमारे १० लाख ८० हजार रुपये किमतीचा १६ किलो ९६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ जुलैला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, शहादा येथून धडगावकडे काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून बेकायदेशीरपणे गांजाची वाहतूक केली जाणार आहे.

या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि धडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेंद्र जगताप यांच्या पथकाने सापळा रचला. धडगाव-शहादा रोडवरील मुंगबारी फाट्याजवळ पोलिसांनी सापळा रचून वाहन (जीजे ०२. डीएम ७४५३) थांबवले. चालकाची चौकशी केली असता त्याने केतनभाई ऊर्फ कान्हा दिनेशभाई वेकरिया (वय ३१, रा. सुरत) असे नाव सांगितले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात ५.६८ किलो गांजा आढळून आला, ज्याची किंमत सात लाख ९४ हजार ४०० रुपये आहे.

केतनभाई वेकरियाने चौकशीत सांगितले की, त्याने हा गांजा शिरपूर येथून खरेदी केला होता आणि त्याला आणखी गांजाची गरज असल्याने तो धडगाव येथील एका व्यक्तीकडून माल घेण्यासाठी आला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुन्हा सापळा रचला आणि धडगावहून गांजा विक्रीसाठी आलेला दुचाकीस्वार बुध्या कोहऱ्या पावरा (वय ३१, रा. उमराणी खुर्द, ता. धडगाव) याला दुचाकीसह (एमएच ३९, एके ४९४१) ताब्यात घेतले.

त्याच्या दुचाकीवर ११.२८ किलो गांजा आढळून आला. दोन्ही संशयितांकडून एकूण १६ किलो ९६ ग्रॅम गांजा आणि दोन वाहने, असा सुमारे १० लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धडगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-१९८५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस. अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, धडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्यासह सजन वाघ, विशाल नागरे, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे, अभय राजपुत, यशोदीप ओगले, जयेश गावीत, स्वप्नील गोसावी, विकास चौधरी, प्रतापसिंग गिरासे, विश्वजित चव्हाण आणि सुनीलकुमार सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---