Crime News: जावयाचा गावातील लोकांसोबत चालू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या सासूची गोळी लागून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रमावती (४५ वर्ष) असं मृत महिलेचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामवती यांचे जावई संजीव पांडे हे त्यांच्या कारने नौपूर येथील त्यांच्या सासुरवाडीकडे जात होते. वाटेत बिस्केटू सिंग त्यांच्या दोन लहान पुतण्यांसह दुचाकीवरून येत होते. संजीव पांडे यांची दुचाकी कारला थोडीशी धडकली. या प्रकरणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. दोघांमधील वाद वाढतच बिस्केटू त्यांच्या भाच्यांना घरी सोडून संजीवकडे परत आला. दरम्यान, संजीवची सासू रमावती यांना ही बाब कळली. ती त्यांच्या जावयाला वाचवण्यासाठी आणि वाद शांत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचली. या वादादरम्यान एक गोळी रमावतीला लागली . यात रमावती जागीच मृत्युमुखी पडल्या.
घटनेची माहिती मिळताच अत्रौलिया(आजमगढ, उ.प्र.) पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. प्राथमिक तपासात जुन्या वादातून ही घटना घडल्याचं समोर आले आहे. चिराग जैन (एसपी ग्रामीण) यांनी याबाबतची माहिती दिली आहे.