Crime News : चोरट्यांची करामत, आधी गोडाऊनचे पत्रे कापले, मग..

जळगाव : येथील एमआयडीसी मधील जी- सेक्टरमध्ये एका कंपनीच्या गोडाऊनचे पत्रे कापून काउंटर मधून १ लाख ११ हजार ४३० रुपये रुपयांची रोकड अज्ञात चोरटयांनी चोरुन नेले. ही घटना सोमवारी २ सप्टेंबर रोजी उघड झाली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एमआयडीसीत जी- सेक्टरमध्ये इन्स्टाकार्ड सर्विसेस कंपनी आहे. या कंपनीत १ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते २ सप्टेंबर सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या गोडाऊनचे पत्रे कापून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी काउंटरमधून १ लाख ११ हजार ४३० रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी सोमवार, २  रोजी रात्री १० वाजता पवन किशोर गाडीलोहार (वय-२७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर करीत आहे.