Crime News : वाहन चोरट्याना मुद्देमालासह अटक ; वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे पथकाचे कौतुक

जळगाव : चोरलेल्या दुचाकी किंवा रिक्षा या वाहनांची संशयित विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या शहरात जाऊन वेगवेगळ्या लोकांना गाठुन विक्री केल्याची माहिती त्रिकुटने पथकाला दिली. त्यामुळे ज्यांनी पैसे घेवून चोरीच्या दुचाकी घेतल्या, त्या दुचाकी पथक जप्त करणार आहे. या चोरीच्या दुचाकी मुळ मालकांना दिल्या जातील. ज्यांच्या दुचाकीची चोरी झाली आहे अश्या वाहनधारकांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.

पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव परिमंडळचे अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनात तसेच एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, श्रेणीपोउनि श्रीकृष्ण पटवर्धन, पोहेकॉ संघपाल तायडे, पोहवा मुरलीधर धनगर, पोना प्रवीण भालेराव, पोकॉ सागर पाटील, पोहेकॉ संदीप पाटील, पोहेकॉ जयंत चौधरी, पोकॉ प्रदीप चवरे, पोकॉ ईश्वर पाटील, पोकॉ लोकेश माळी, चापोहेकॉ दीपक चौधरी, चापोहेकॉ भारत पाटील यांच्या पथकाने ही जबरदस्त कारवाई केली.

वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या पथकाच्या कामगिरीबद्दल कौतुक केले. या टोळीचे अन्य वाहन चोरीशी कनेक्शन आहे किंवा कसे ? या अनुषंगानेही तपासात शोध घेतला जात आहे.

महाग दुचाकीवर डोळा
मोठ्या शहरातील महागड्या दुचाकीवर टोळी चा डोळा होता मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, खारघर नवीमुंबई, जुहू मुंबई तसेच बारडोली (गुजरात) येथुन टोळीने दुचाकी चोरल्या. पथकाने १४ दुचाकी, ६ रिक्षा जप्त केल्या, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिली. भारत पाटील यांच्या पथकाने ही जबरदस्त कारवाई केली. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या पथकाच्या कामगिरीबद्दल कौतुक केले. या टोळीचे अन्य वाहन चोरीशी कनेक्शन आहे किंवा कसे ? या अनुषंगानेही तपासात शोध घेतला जात आहे.

चोरीच्या वाहनांची केली विक्री
चोरलेल्या दुचाकी किंवा रिक्षा या वाहनांची संशयित विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या शहरात जाऊन वेगवेगळ्या लोकांना गाठुन विक्री केल्याची माहिती त्रिकुटने पथकाला दिली. त्यामुळे ज्यांनी पैसे घेवून चोरीच्या दुचाकी घेतल्या, त्या दुचाकी पथक जप्त करणार आहे. या चोरीच्या दुचाकी मुळ मालकांना दिल्या जातील. ज्यांच्या दुचाकीची चोरी झाली आहे अश्या वाहनधारकांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.

महाग दुचाकीवर डोळा
मोठ्या शहरातील महागड्या दुचाकीवर टोळी चा डोळा होता मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, खारघर नवीमुंबई, जुहू मुंबई तसेच बारडोली (गुजरात) येथुन टोळीने दुचाकी चोरल्या. पथकाने १४ दुचाकी, ६ रिक्षा जप्त केल्या, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिली.