महायुती सरकारमध्ये गुन्हेगारांना कडक शासन होणारच..!

जळगाव : महाराष्ट्रात बदलापूर आणि इतर ठिकाणी झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भात महायुती सरकारने कडक पावले उचलून आपले कार्य तत्पर पद्धतीने केले आहे. तरीही विरोधक या गोष्टीचे भांडवल करून राजकारण करत महाराष्ट्रात चुकीचा संदेश देत असल्याकारणाने अशा नतदृष्ट विरोधकांचा आज भारतीय जनता पार्टी,जळगाव कडून निषेध करण्यात आला.

यावेळी उपस्थितांनी महिला सन्मानाची व संरक्षणाची शपथ घेतली. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, विशाल त्रिपाठी, शहर महिला अध्यक्ष भारती सोनवणे, माजी महापौर सीमा भोळे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा वर्मा,यांच्या मार्गदर्शनात निषेध व्यक्त करण्यात आले.  यावेळी माजी नगरसेविका दीपमाला काळे,  सुचिता हाडा, गायत्री राणे, सुरेखा तायडे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी धीरज वर्मा, प्रकाश पंडित, गायत्री राणे, नीला चौधरी, प्रल्हाद सोनवणे, प्रमोद कुमावत, नूर खान.  मंडळाध्यक्ष मनोज काळे, संजय शिंदे, राहुल घोरपडे, सुनील सरोदे, मनोज काळे, शक्ति महाजन, विनोद कुमावत, महादू सोनवणे उपस्थित होते. तसेच भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.