इजिप्त : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिव,सांच्या इजिप्त दौऱ्यावर पोहोचले आहेत. आज त्यांच्या प्रवासाचा शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इजिप्तमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. यादरम्यान इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी कैरो येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ पुरस्काराने सन्मानित केले. ‘ऑर्डर ऑफ द नाईल‘ हा इजिप्तचा सर्वोच्च सन्मान आहे. एका माहितीनुसार, ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ हा इजिप्तचा सर्वोच्च राज्य सन्मान आहे.
पुरस्कार सोहळ्या आधी पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष यांनी सामंजस्य करारवर स्वाक्षरी केली :
मोदीनी केली बोहरा समाजाची विचारपूस :
पंतप्रधान नरेंद्र मोदी कैरो येथील अल-हकीम मशिदीत पोहोचले. यादरम्यान भारतीय वंशाचे बोहरा समाजाचे सदस्य शुजाउद्दीन शब्बीर तांबावाला (जे आज पंतप्रधान मोदी तेथे गेले तेव्हा अल-हकीम मशिदीत उपस्थित होते) म्हणाले की, Order of the Nile आजचा दिवस आमच्यासाठी ऐतिहासिक आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आज येथे आले होते आणि त्यांनी आमच्या बोहरा समाजाचीही विचारपूस केली आणि त्यांनी आमच्याशी संवाद साधला तेव्हा आम्ही एक कुटुंब असल्यासारखे वाटले.
हा क्षण आमच्या सदैव लक्ष्यात राहील असे ते म्हणाले .