पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची आज बैठक होणार आहे. या बैठकीत महागाई भत्ता वाढीसंदर्भातील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे होळीपूर्वी सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट मिळू शकत. याआधीही होळीपूर्वीच सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट दिली होती.
केंद्र सरकारकडून महागाई भत्ता वाढवणाच्या निर्णयासंदर्भात सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स कडून प्रतीक्षा केली जात आहे. आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत या बाबत निर्णय होईल अशी शक्यता आहे.
दरम्यान, मार्च महिन्यात होळीचा सण आहे तर महिना अखेर रमजान ईद आहे. सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता म्हणजेच डीएमध्ये वाढ देऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 53 टक्के आहे. तो वाढून 56 टक्के होऊ शकतो.
हेही वाचा : “जे बोललो ते…” अखेर नामदेव शास्त्रींची मानसिकता बदलली, ‘त्या’ वक्तव्यावरून ‘यू टर्न’
केंद्र सरकार एका वर्षात दोन वेळा 49 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनर्सला महागाई भत्ता देतं. पहिली वाढ जानेवारी ते जून या कालावधीसाठी तर जुलै ते डिसेंबर या काळात केली जाते. वाढवलेला महागाई भत्ता मार्चच्या पगारातून दिला जाऊ शकतो. तर, जानेवारी आणि फेब्रुवारीचा फरक देखील सोबत मिळेल. महागाई भत्ता 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल.
सध्या सातवा वेतन आयोग लागू आहे, ज्यानुसार महागाई भत्ता वाढवला जातो. मात्र, सराकरनं आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली आहे. ज्याची समिती अद्याप स्थापन करण्यात आलेली नाही. 1 जानेवारी 2026 पासून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होतील तेव्हा महागाई भत्ता कशा प्रकारे द्यायचा आणि कसा वाढवायचा ते ठरवलं जाईल.
महागाई भत्त्याची गणना AICPIN च्या आकड्यांच्या आधारे केली जाते. सातव्या वेतन आयोगानुसार ठरवून दिलेल्या मानकाप्रमाणे वर्षातून दोनवेळा महागाई भत्त्यात वाढ केली जाते. पहिली दुरुस्ती १ जानेवारीपासून लागू होते, तर दुसरी दुरुस्ती त्याच वर्षी1 जुलैपासून लागू होते. त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.