तरुण भारत लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२२ । माकड ‘वानर’ हे चपळ आणि बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखले जातात. मात्र, लातूर जिल्ह्यातील सोनखेड गावात एका माकडानं सुमारे ६० लोकांचा चावा घेतल्यानं नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. परंतु पाच दिवसांनंतर त्या वानराला आणि अन्य पाच अश्या सहा माकडांना वनविभागाने पकडले आहे. त्यामुळे येथील गावकऱ्यांची त्या पिसाळलेल्या वानरापासून सुटका झाली आहे.
निलंगा तालुक्यातील सोनखेड गावांमध्ये एका पिसाळलेल्या वानराने 60 लोकांचा चावा घेतला होता. गेल्या पाच दिवसांपासून गावकरी व लातुरची वन विभाग त्या वानराला पकडण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवित होते. पण त्यांना काही केले तरी ते वानर सापडत नव्हते. त्यानंतर औरंगाबाद येथील वन विभागांच्या पथकाला त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले. त्याला पथकांनी पिसाळलेल्या वानराला पकडून पिंजऱ्यात बंद केले आहे.