तरुण भारत लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२२ । पाचोरा तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) शिवारात मोहाडी जंगलाजवळ असलेल्या शेतात बिबट्याने वासरूचा फडशा फस्त केला. यामुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकणी वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला. दरम्यान, आठवडाभरात हा तिसरा हल्ला असल्याचे सांगण्यात आले.
शेतकरी अशोक पाटील हे शेतात गेले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. घटनास्थळी खेडगाव (नंदीचे) येथील उपसरपंच अभिमान बाविस्कर, नुकसानग्रस्त शेतकरी अशोक पितांबर पाटील, बापू ढमाले, वामन संतोष पाटील, दिपक विश्वनाथ पाटील, अशोक पाटील, पोलीस पाटील चंद्रशेखर पाटील, पिंटू गुजर, दत्तू ढमाले उपस्थित होते. वन विभागाचे कर्मचारी राहुल कोळी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पुढील कारवाईसाठी संबंधित कार्यालयाला अहवाल पाठवणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी दिली.
दरम्यान, खेडगाव (नंदीचे) परीसरात आठवड्याभरात तिसरा हल्ला असून वन विभागाच्या कर्मचार्यांनी तसेच अधिकार्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बिबट्याचा शोध घेऊन पकडण्याची मागणी केली आहे.