जामनेर: दोन वर्षांपूर्वी पहूर येथील भुसार मालाचे व्यापारी अनिल रिखचंद कोटेचा घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल दोन लाख रोख रक्कम सह सोने चांदी च्या दागिन्यांसह बारा लाख ६६ हजार लंपास झाल्याची घटना घडली. स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी संध्याकाळी पाच जणांना जळगावातून जेरबंद केले. विशेष म्हणजे, या चोरीचा मास्टर माईंड महिला असून व्यापारी यांचे नातेवाईक असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ही महिला सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या कौतुकास्पद कामगिरीने खळबळ उडाली आहे.
पहूर येथील भुसार मालाचे व्यापारी अनिल रिखबचंद कोटेचा हे राजस्थान येथे गेले होते. यादरम्यान २५ ते २८ आँगस्ट २०२१ मध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दोन लाख रोख व सोने चांदीचा ऐवज असा बारा लाख ६६ हजाराची घरफोडी केली होती. अनिल कोटेचा यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत होती. चोरट्यांच्या मागावर पोलीस होते. बुधवारी एका महिलेसह चार जणांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी आवळल्या असून एक फरार आहे. संबधितांना पहूर पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. या घटनेने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. सैय्यद सरजील हारून(२७) रा. मास्टर कॉंलनी ,अनिल रमेश चौधरी (४०) रा. आयोध्यानगर,सैय्यद अराफत सैय्यद फारूक (३३) रा तांबापुरा,सैय्यद आमिन उर्फ बुलेट सैय्यद फारूख व भावना जवाहरलाल लोढा (४० ) रा रायसोनी नगर सर्व राहणार जळगाव व एक फरार आहे.
नातेवाईक महिला मास्टर माईंड
भावना लोढा ही अनिल कोटेचा यांची आतेबहिण आहे.२५ जुलै २०२१ मध्ये शिर्डी येथे अनिल कोटेचा यांच्या भाचीच्या लग्ना निमित्ताने भावना हिची आई अर्थात अनिल यांची आत्या यांना पहूरला अनिल कोटेचा यांना घेऊन आले.यावेळी सोबत भावनाही आली.लग्नाच्या निमित्ताने केलेले दागिने आत्याला दाखवितांना भावनाच्या दृष्टीस पडले. यादरम्यान तिने रेकी केली. विवाहाच्या एक महिन्या नंतर अनिल कोटेचा हे २५ आँगस्ट रोजी राजस्थान गेल्याची खात्री भावना ने केली. व आपल्या साथीदारांसह प्रमुख अनिल चौधरी यांनी घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यात मास्टर माईंड म्हणून भावना समोर आली असून नात्याला काळीमा फासण्याचे कृत्य भावनाने केल्याने नात्यावरील विश्वासहर्तेचे प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे.
जामनेरातील सख्या भावाकडे चोरी
जामनेरातील भावनाहिचा सखा भाऊ विनोद लोढा यांच्या कडेही जवळपास सतरा ते विस लाखांची घरफोडीची घटना घडली आहे. भावना साथीदार यांचा हात असल्याचीही तपासा दरम्यान समोर येत असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.
हायप्रोफाईल सराईत गुन्हेगार
भावना ही पोलीस रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून रेल्वेत सोनसाखळी, महिलांची पर्स व दागिने लांबविणे अशा स्वरुपात गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, हायप्रोफाईल म्हणून महिला गुन्हे गार असल्याचे दिसून आले आहे. घरफोडी ची फाईल बंद झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पोलीस निरीक्षक नजनराव पाटील यांनी फाईल ओपन करून गुन्हेगायांना जेरबंद करण्यात यश मिळविल्याले आहे. यामुळे पहूर सह परीसरातील घरफोडी च्या घटनांशी भावना व तिच्या साथीदारांचे धागेदोरे आहेत का?याचा तपास पोलीस घेत आहेत.
जळगावातून ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखा,पोलीस निरीक्षक नजनराव पाटील,साहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत कांबळे,पोलीस उप निरीक्षक सचिन डोंगरे,साहाय्यक फौजदार रवी नरवाडे,जयंत चौधरी,विनोद पाटील, किशोर राठोड, ईश्वर पाटील, सचिन महाजन,रणजित जाधव या पथकाने भावना लोढा यांच्या प्रर्यंत चे धागेदोरे संपुष्टात आणले असून पहूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांची संयुक्त कामगिने हायप्रोफाईल गुन्हेगारी उघड केली आहे. या संबधितांचा ताबा बुधवारी पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे,पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड,साहाय्यक फौजदार, प्रकाश पाटील, विनोद पाटील, गजानन ढाकणे,भरत लिंगायत यांनी घेऊन रात्री अटक केली.