जळगाव बाजार समितीत ‘दादर’ ने गाठला नवा उच्चांक! हमीभावापेक्षा मिळाला तब्बल ‘इतका’ दर, शेतकरी खुश..

---Advertisement---

 

रब्बी हंगामातील काढणीला सुरुवात होताच जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध पिकांची आवक वाढू लागली आहे. गहू, हरभरा आणि मका यांची लागवड यंदा मोठ्या प्रमाणावर झाल्याने या पिकांची बाजारात चांगली उपस्थिती दिसत आहे. मात्र, सध्या सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे ते ‘दादर’ या पिकाने.

दादरची लागवड तुलनेने कमी झाल्याने बाजारात त्याचा पुरवठा मर्यादित आहे. दुसरीकडे, मागणी वाढल्याने या पिकाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. १६ मार्च रोजी दादरला प्रति क्विंटल ₹५,१०० पर्यंत भाव मिळाला, जो शासनाने निश्चित केलेल्या ₹३,४२१ हमीभावापेक्षा सुमारे ₹२ हजारांनी अधिक आहे. त्यामुळे या पिकाचे उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

बाजार समितीत एका दिवसात सुमारे १७०० क्विंटल दादरची आवक नोंदवली गेली. वाढलेल्या दरांचा फायदा घेण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने बाजारात येताना दिसत आहेत.

दरम्यान, इतर पिकांच्या दरात विशेष चढ-उतार दिसून आलेला नाही. हरभऱ्याला ₹४,८०० ते ₹५,००० दरम्यान भाव मिळत असून, मेक्सिको हरभऱ्याचा दर ₹८,६०० पर्यंत पोहोचला आहे. सोयाबीन सुमारे ₹५,३४५ दराने विकले जात आहे, तर गव्हाला ₹२,३५० चा दर मिळत आहे.

बाजार समिती प्रशासनाच्या माहितीनुसार, गहू, हरभरा आणि मक्याचे उत्पादन भरपूर असले तरी दादरचे क्षेत्र कमी असल्यानेच त्याच्या दरात ही तेजी दिसून येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---