---Advertisement---

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या वकीलाचे अपहरण, बोपदेव घाटात नेलं अन्…

by team
---Advertisement---

काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एका 26 वर्षीय तरुणीवर ‘शिवशाही’ बसमध्ये 25 फेब्रुवारीच्या पहाटे अत्याचार केल्याची घटना घडली होती. रुणी पुण्याच्या स्वारगेटवरुन फलटणला जात होती. तरुणी एकटी बसल्याचं दिसल्यानंतर आरोपीनं तिला बोलण्यात गुंतवत एका शिवशाही बसमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा सध्या पोलीस कोठडीत आहे.

दरम्यान आरोपी दत्ता गाडे चे वकील साहिल डोंगरे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.  17 मार्च रोजी संध्याकाळी हडपसर येथुन डोंगरे यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. काल (सोमवारी) संध्याकाळी हडपसर येथून डोंगरे यांचे अपहरण करुन त्यांना बोपदेव घाटात नेण्यात आले, त्यानंतर त्यांना मारहाण करून दिवे घाटात सोडून देण्यात आले . ॲडव्होकेट डोंगरे यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

मारहाण झाल्यानंतर साहिल डोंगरे यांनी जखमी अवस्थेत हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. या हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दत्ता गोडेचे वकील वाजीद खान यांचे साहिल डोंगरे सहायक वकील आहेत. 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment