सुनेचा प्रताप ! चक्क डॉक्टरांना विचारलं ‘सासूला’ मारण्याचं औषध

सासू-सुनेच्या नात्यात तणाव असणे नवीन नाही, पण कर्नाटकातील एका महिलेने आपल्या सासूला संपवण्याचा कट रचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेंगळुरूमधील एका डॉक्टरने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण समोर आले.

डॉ. सुनील कुमार यांच्या व्हॉट्सअॅपवर १७ फेब्रुवारी रोजी ‘सहाना’ नावाच्या महिलेचा एक मेसेज आला. या मेसेजमध्ये तिने डॉक्टरला विचारले, “मला असे काही औषध सांगा ज्याने मी माझ्या सासूला मारू शकेन.”

डॉक्टरने हे वाचून धक्का बसला आणि तिला प्रतिप्रश्न केला की ती असे का करू इच्छित आहे. त्यावर सहानाने उत्तर दिले की तिची सासू तिला खूप त्रास देते आणि आता ती ते सहन करू शकत नाही. मात्र, डॉक्टरने तिला स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्ही डॉक्टर आहोत, आमचे काम जीव वाचवणे आहे, जीव संपवणे नाही.”

हेही वाचा : दुर्दैवी! आई मिसळ घेऊन परतली अन् दिसला मुलाचा मृतदेह, रजेवर आलेल्या जवानाची आत्महत्या

डॉक्टर आणि सहान यांची WhatsApp chat

सहाना- नमस्कार! मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे, पण मला भीती वाटते की तुम्ही माझ्यावर ओरडाल.

डॉक्टर- तुम्हाला काय म्हणायचे आहे ते सांगा?

सहाना- मला सांगायला भीती वाटते.

डॉक्टर- घाबरू नका, मला सांगा.

सहाना- मला असे काही औषध सांगा ज्याने मी माझ्या सासूला मारू शकेन.

डॉक्टर- खून? पण का?

सहाना- माझी सासू मला खूप त्रास देते. मी आता तिचा छळ सहन करू शकत नाही.

डॉक्टर- आम्ही डॉक्टर आहोत, आमचे काम जीव वाचवणे आहे. कोणाचा जीव घेणे नाही.

डॉक्टरने घेतले स्क्रीनशॉट, पोलिसांत तक्रार

या संभाषणानंतर, सहानाने सर्व चॅट्स डिलीट केल्या आणि डॉक्टरचा नंबर ब्लॉक केला. मात्र, डॉक्टर सुनील कुमार यांनी आधीच त्या मेसेजचे स्क्रीनशॉट जतन केले होते आणि ते सोशल मीडियावरही शेअर झाले. यानंतर त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली आणि या संदर्भात संजयनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

हेही वाचा : भारतातलं असंही एक गाव, लग्नानंतर वधू सात दिवस राहते विवस्त्र, जाणून घ्या कुठली आहे ‘ही’ प्रथा

डॉ. सुनील कुमार हे केवळ डॉक्टर नसून सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय आहेत. त्यांनी यापूर्वी विजयपुरा येथून आमदारकीच्या निवडणुकीतही भाग घेतला होता. त्यामुळे हे प्रकरण केवळ कौटुंबिक संघर्ष नसून त्यांच्याविरोधात एखादा कट असू शकतो, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून ‘सहाना’ नावाच्या महिलेचा शोध घेत आहेत. तिच्या फोन नंबरच्या आधारे तिला शोधण्याचे काम सुरू आहे. तसेच, डॉक्टरने दिलेले स्क्रीनशॉट फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.