---Advertisement---

Attack 26/11 : मुंबईवरील हल्ल्यात दाऊद इब्राहिमचा हात ? एनआयए काढणार तहव्वूर राणाकडून सत्य

by team
---Advertisement---

नवी दिल्ली : मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयए तहव्वूर राणाची कसून चौकशी करीत आहे. या हल्ल्याच्या कटात त्याची भूमिका तपासण्यासोबतच, हल्ल्याच्या कटात कोण-कोण होते, याचा मागही काढत आहे. राणाची दुसऱ्या दिवशीही चौकशी झाली. कुख्यात पळपुटा गुंड दाऊद इब्राहिमचा संबंध मुंबई स्फोटात होता का आणि तहव्वर राणासोबत त्याचा संबंध होता का. याचा तपास एनआयए करीत आहे.

या कटात सहभागी असलेल्या इतर लोकांची माहिती समोर यावी यासाठी एनआयए तहव्वर राणा आणि डेव्हिड कोलमन हेडलीत झालेल्या कॉल्सचे रेकॉर्डिंगची तपासणी करीत आहे. केवळ इतके नव्हे, तर दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित कॉल रेकॉर्डची पुष्टी करण्यासाठी राणाच्या आवाजाचा नमुना घेण्याच्या तयारीत एनआयए असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एनआयएला दुबईतील एका व्यक्तीची माहिती मिळाली असून, डेव्हिड कोलमन हेडलीच्या सांगण्यानुसार राणाने त्याची भेट घेतली होती. त्या व्यक्तीला भारतावर दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती होती. ती व्यक्ती म्हणजे दाऊद इब्राहिम होता अथवा त्याच्या टोळीतील इतर कुणी गुंड होता, त्याची माहिती एनआयए घेत आहे.

पाकिस्तानची कुटील गुप्तचर संस्था आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबासोबत राणाचा थेट संपर्क किंवा अप्रत्यक्ष संबंध होता का, याचा तपासही केला जात आहे. मुंबई हल्ल्याचा कट जवळपास २००५ पासून स्वला जात होता, अशी शंका तपासयंत्रणेला आहे. तपासात मदत मिळावी, यासाठी राणाच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले. त्याची पडताळणी राणाने केलेल्या कॉल्ससोबत केली जाईल. हे कॉल्स राणाने मुंबईवरील हल्ल्यानंतर लगेच केले होते. हल्ल्यापूर्वी राणाने भारतातील कित्येक ठिकाणांना भेट देऊन रेकी केली होती. त्याने कट रचण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.

कथित ‘पत्नी’चा शोध सुरू

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्बूर राणा याला अखेर भारतात आणले आहे. अमेरिकेतून प्रत्यार्पण करून भारतात आणल्यानंतर कडून त्याची चौकशी सुरू आहे. मुंबई हल्ल्यात आयएसआय, लष्कर ए तोयबासारख्या दहशतवादी संघटनांची काप भूमिका होती, याचा शोध घेतला जात आहे. राणाने चौकशीत महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

राणा उच्च सुरक्षा असलेल्या कोठडीत

अमेरिकेतून प्रत्यार्पण झाल्यानंतर राणाला भारतात आणल्यानंतर न्यायालयाने त्याला १८ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. त्याला एनआयएच्या मुख्यालयातील उच्च सुरक्षा असलेल्या कोठडीत ठेवण्यात आले. केवळ मुंबईच नव्हे, तर देशातील इतर शहरांवरील संभाव्य हल्ल्यांच्या कटाबाबतही राणाची चौकशी केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment