Chakan: चाकणमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार; कंपनीतील व्यवस्थापक गंभीर जखमी

Chakan: पुण्यातील  चाकण एमआयडीसी परिसरात भरदिवसा  गोळीबाराची घटना घडली आहे. स्टील कंपनीच्या मालकावरच गोळ्या झाडल्याने परिसरात एकाच  खळबळ उडाली आहे. या गोळीबाराच्या हल्ल्यात कंपनी व्यवस्थापक  गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

चाकण एमआयडीसी परिसरात आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून  स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमधील कैलास स्टीलचे मालक अजित सिंग हे कंपनीत उभे होते. प्रवेशद्वारावर आलेल्या दुचाकीवरून दोघांपैकी एकाने त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला.

या हल्ल्यात त्यांच्या पाठीत आणि पोटात या दोन गोळ्या घुसल्या. नंतर त्यांना चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

ही घटना घडल्यानंतर गुन्हे शोध पोलिसांचे पथक कंपनीतील व कंपनी बाहेरील सीसीटीव्ही फुटेज व इतर फुटेज तपासत आहेत. त्यानंतर आरोपी कोण आहे हे समजणार आहे. असे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी सांगितले.

खंडणीच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, जखमी असलेल्या कंपनी मालकांनीही तशी मागणी कोणाकडूनही झाली नसल्याचे म्हटले. अजय सिंग यांच्यावर सकाळी पावणे अकरा-अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोन आरोपी असून दोघांकडून हा हल्ला करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस व गु्न्हे शाखेचे 10 ते 12 पथक कार्यरत झाले आहेत.