---Advertisement---

पार्टीला गेलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला, धुळ्यातील खळबळजनक घटना

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२२ । पार्टीला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेला तरुण दुसऱ्या दिवशी सकाळी मृत अवस्थेत आढळून आला. ही घटना मेहेरगाव, धुळे. येथे आज सकाळी उघडीस आली. दरम्यान, तरुणाच्या मृतदेहाच्या बाजूला वायर आढळून आली, याच वायरने गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अमोल विश्वास भामरे (रा. मेहेरगाव धुळे) असं मृत तरुणाचं नाव आहे.

व्यायामासाठी गेलेल्या तरुणांना हा मृतदेह दिसला 
भामरे हा तरुण दि.३० नोव्हेम्बरला रात्री पार्टीला जात असल्याचे सांगून घराबाहेर निघाला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. आज सकाळी गावाबाहेर असलेल्या जी टी पाटील इंग्लिश मीडियम शाळेजवळ मोकळ्या मैदानावर सकाळी व्यायामासाठी गेलेल्या तरुणांना एक जण मृतावस्थेत आढळून आला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी गावातील काही मंडळी जमली आणि हा मृतदेह अमोल भामरे याचा आहे हे कळताच त्यांच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सोनगीर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून अमोल भामरे याच्या मृतदेहाच्या बाजूला वायर आढळून आली, याच वायरने गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसंच काही अंतरावर दारूच्या बाटल्याही पडलेल्या असल्यामुळे पार्टी दरम्यान वाद होवून घातपात केल्याची गावात चर्चा आहे. दुपारी उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी योग्य तपास करावा
दरम्यान, यासंदर्भात अमोल भामरे यांच्या कुटुंबियांनी अमोल भामरे हा ड्रायव्हर होता आणि तो आपले काम प्रामाणिकपणे करायचा. काल पार्टीला चाललो असे सांगून घरातून बाहेर पडला, मात्र रात्री घरीच परतला नाही. त्यामुळे त्यांनी गावात शोधाशोध सुरू केला. अमोल भामरे याचं कोणाशीही वैयक्तिक शत्रुत्व नव्हतं. मात्र त्याचा घात कोणी व का केला? याची आम्हाला कल्पना नाही, त्यामुळे पोलिसांनी योग्य तपास करावा, अशी मागणी कुटुंबीयांनी यावेळी केली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment