---Advertisement---

Death in Dream : स्वप्नात स्वतःचा किंवा कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू पाहण शुभ की अशुभ? जाणून घ्या..

by team
---Advertisement---

Death in Dream : स्वप्न पाहाणं ही एक सर्वसामान्य प्रक्रीया आहे. रात्री झोपल्यावर सर्वजण स्वप्नं पाहातात. कधी एखादं भयानक संवप्न आपल्याला झोपेतून खडबडून जागं करतं तर कधी एखादं मजेशीर स्वप्न आपल्याला पोट धरुन हसवतं. कधी एखादं गूढ आपल्याला विचार करायला भाग पाडतं तर कधी आपल्या आसपास झालेल्या घटनाही आपल्याला स्वप्नात पाहायला मिळतात. स्वप्न ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीची असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी खास अर्थ दडलेला असतो असं स्वप्नशास्त्र सांगतं. आज आपण अशाच एका स्वप्नाबद्दल बोलणार आहोत.

स्वप्नात मृत्यू पाहाण्याचा काय असतो अर्थ या बाबत आपण जाणून घेणार आहोत. घाबरून जाऊ नका मात्र अनेकांना स्वप्नात इतरांचा किंवा स्वतःचा मृत्यू झाला असं दिसतं आणि या व्यक्ती त्यांना पडलेलं हे स्वप्न शुभ आहे की अशुभ याचा विचार खडबडून जागे झाल्यावर करतात. चला जाणून घेऊयात या भयावह स्वप्नाचा नेमका अर्थ काय?

स्वप्नात स्वत:चा मृत्यू पाहाणे

आपण एखाद्या कठीण परिस्थितीतून जात असल्यास आणि आपण हे स्वप्न पाहिल्यास त्याचा अर्थ असा होतो की हे एक शुभ स्वप्न आहे. स्वप्न शास्त्रानुसार असं स्वप्न पडल्याचा अर्थ असा असतो की तुम्ही दीर्घायुष्यी झाला आहात. एवढंच नाही तर तुमच्यावर भविष्यात जी संकट येणार होती ती आता टळली आहेत. सोबतच तुम्हाला भविष्यात धन प्राप्तीचा योग आहे. तुम्हाला अचानक धनप्राप्ती होऊ शकते. जर स्वप्नात तुम्ही स्वत:ला आत्महत्या करताना पाहिलं तर ते देखील एक शुभ स्वप्न आहे. याचा अर्थ देखील तुम्हाला दीर्घायुष्य मिळणार असून अचानक धनलाभ होणार आहे असा होतो.

कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू स्वप्नात पाहाणे

जर तुम्ही तुमच्या स्वप्नात तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे असं पाहिलं, तर ते देखील एक शुभ स्वप्न आहे. याचा अर्थ असा होतो की तुम्ही स्वप्नात ज्या व्यक्तीचा मृत्यू होताना पाहिलं आहे, त्या व्यक्तीला दीर्घायुष्य लाभतं. जर त्या व्यक्तीला एखादा आजार असेल तर त्या आजारातून ती व्यक्ती लवकरच बरी होणार आहे, असे संकेत देखील त्यातून मिळतात. तो व्यक्ती त्याच्या आयुष्यात एक नवी सुरुवात करणार आहे असा त्याचा अर्थ होतो, असं स्वप्न शास्त्र सांगतं.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment