---Advertisement---

गोरखपूर-पुणे एक्स्प्रेसच्या धडकेत जळगावात अनोळखी तरुणाचा मृत्यू

by team
---Advertisement---

जळगाव ः येथील रेल्वेस्थानकानजीकच्या सोमवारी (1 जुलै) एक्स्प्रेसच्या बसलेल्या धडकेत 25 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील रेल्वेस्थानकानजीकच्या खांब क्रमांक 419/1026 अप रेल्वेमार्गावरील पुलाजनजीक मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास धावत्या गोरखपूर-पुणे एक्स्प्रेसच्या धडकेत 25 वर्षीय अनोळखी तरुण जखमी झाला. घटनेबाबत उपस्टेशन प्रबंधक श्रीवास्तव यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात माहिती कळविली. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी जखमी तरुणाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी (1 जुलै) पहाटे पाचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. अंगात लाल-काळ्या रंगाचे टी-शर्ट, पांढर्‍या रंगाचा बनियान, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, केस काळे वाढलेले, शरीरबांधा सडपातळ, रंगा गोरा असे मृत तरुणाचे वर्णन आहे. रेल्वे पोलीस ठाण्याचे हवालदार सचिनकुमार भावसार तपास करीत आहेत. मृत तरुणाची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment