एकीकडे सलमान खान सारख्या बड्या कलाकाराला धमकावल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच साऊथ सुपरस्टार आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पवन कल्याण यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पवन कल्याण यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सोमवारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य करणारा एक मेसेज आणि कॉल आला होता, जिथे अपशब्द वापरले आणि धमकीचा मेसेज देखील पाठवला. मिळालेल्या माहितीनुसार, धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.
पवन कल्याण यांच्या जनसेवा पार्टीच्या ट्विटर हँडलवरूनही एक पोस्ट करण्यात आली होती. ते लिहितात, ‘मोबाईलवर धमकीचा कॉल आला होता. उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना एका अनोळखी क्रमांकावरून धमकीचा फोन आला असून, त्यांना जीवे मारणार असल्याचे सांगितले. यानंतर अनेकांना शिवीगाळ करणारे मेसेजही आले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.’