---Advertisement---

ममतांच्या कट्टरपंथी आमदाराने पश्चिम बंगालला घोषित केले मुस्लीम राष्ट्र

by team

---Advertisement---

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तजमुल नावाच्या व्यक्तीने रस्त्याच्या मधोमध एका जोडप्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओबाबत भाजप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षावर निशाणा साधत आहे. उत्तर दिनाजपूरमधील या व्हिडिओमध्ये, तजमुल उर्फ ‘जेसीबी’ म्हणून ओळखला जाणारा एक माणूस, त्यांच्या प्रेमाला ‘बेकायदेशीर’ म्हणत पंचायतमध्ये एका मुलगा आणि मुलीला बांबूच्या काठीने मारहाण करताना दिसत आहे.

तजमुल हा दिनाजपूर जिल्ह्यातील चोप्रा येथील स्थानिक टीएमसी नेता असल्याची माहिती समोर आली आहे. तजमुलने चालवलेल्या तालीबानी न्यायालयाच्या निर्णयानंतर ही मारहाण करण्यात आली. पश्चिम बंगाल पोलिसांनी या प्रकरणी तजमुलला अटक केली आहे. पण, आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या जागी चोप्राचे आमदार हमीदुल रहमान यांनी आरोपीच्या कृत्याचे समर्थन केले.

महिलेचे कृत्य समाजविघातक असल्याचे आमदार म्हणाले. तजमुलचा टीएमसीशी काहीही संबंध नाही, असा दावाही हमीदुल यांनी केला. हमीदुल रहमान पुढे म्हणाले की, हा गावाचा विषय असून पक्षाशी त्याचा काहीही संबंध नाही. तृणमूल आमदार पुढे म्हणाले की, आम्ही या घटनेचा निषेध करतो, पण महिलेनेही चुकीचे केले. तिने पती, मुलगा आणि मुलगी सोडली हे चुकीचे आहे. आमदार म्हणाले की, मुस्लिम राष्ट्रानुसार काही नियम व न्याय आहेत. या घटनेवरून भाजपने टीएमसीवर हल्लाबोल केला आहे.

एक्स हँडलवरील एका पोस्टमध्ये भाजपने म्हटले आहे, ममतांचे आमदार मुस्लिम राष्ट्राबद्दल बोलत आहेत. टीएमसीने पश्चिम बंगालला मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित केले आहे ज्यामध्ये शरिया नियम लागू केला जाईल? “आमच्या मुस्लिम राष्ट्रात काही नियम आहेत, शिक्षा आहेत.. या प्रकरणात अतिरेक झाल्याचे दिसते. आम्ही याबद्दल स्थानिकांशी बोलत आहोत.” असा दावाही हमीदुल यांनी केला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment