जळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला आपली ताकद दाखवली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आपले पाय घट्ट करत आहे. यात काँग्रेस, शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. याच धर्तीवर आप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश सोहळा शनिवार, १७ रोजी काँग्रेस भवनात महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटीच्या उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे व जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शाम तायडे यांच्या उपस्थितीत पार पडला. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्ष नेता व काँग्रेसचे नेते राहुल गांधी व महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ना. बाळासाहेब थोरात व जळगाव जिल्ह्याच्या प्रभारी प्रतिभा शिंदे व जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष, मा श्री शाम तायडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात आप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला.
यात आप जिल्हा अध्यक्ष महानगर अध्यक्ष अमृता नेतकर, भारतीय नागरिक आघाडी जिल्हाध्यक्ष रईस कुरेशी, पर्यावरण आघाडी जिल्हाध्यक्ष लूकमान लोखंडवाला, सोशल मीडिया प्रमुख इरफान शेख, युवा आघाडी शहराध्यक्ष नाझिम कुरेशी, शिक्षक आघाडी तोसिफ खान, कामगारा आघाडी असलम पठाण, जिल्हा सदस्य आरिफ खान, सुरज तडवी, राजेंद्र जंजाळ, अमित राठोड , मोहम्मद कैफ, हसन शेख ,सलीम मणियार, अमित मणियार ,रफिक शहा, विलास राठोड , भूषण नगरे, तावडे सर, सय्यद तारीफ ,वसीम तडवी ,अनिल वाघ सर आदी विविध कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जळगाव काँग्रेस पक्ष प्रवेश केला.
यावेळी प्रतिभा शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सर्वांच्या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला अधिक बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात युती सरकारच्या कारभाराला व गलिच्छ राजकारणाला कंटाळलेले अनेक इतर पक्षातले कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षात येतील व राज्यात तसेच जळगाव जिल्ह्यात काँग्रेस व महाविकास आघडीचीच सत्ता येईल असेही त्यांनी मत व्यक्त केले.