संरक्षणमंत्र्यांचा पाकला इशारा, म्हणाले…

surgical strike: छत्तीसगडमध्ये यंदा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राज्यात मोर्चेबांधणी सुरू आहे.  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कांकेर जिल्हा मुख्यालयातील नरहरदेव हायस्कूलच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामगिरीवर प्रकाश टाकला आणि भारताच्या शेजारी देशाला इशारा दिला की, जर कोणी देशाचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. तर त्यांना  योग्य उत्तर दिले जाईल. असा इशारा राजनाथसिंग यांनी पाकिस्थानला दिला आहे. संरक्षणमंत्र्यांनी उरी (2016) आणि पुलवामा (2019) मधील दहशतवादी हल्ल्यांनंतर भारताच्या प्रतिक्रियेचा संदर्भ दिला आणि ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एक शक्तिशाली देश म्हणून उदयास आला आहे. आपला देश आता कमकुवत राहिलेला नाही.  दहशतवाद्यांनी भारतात

मी तेव्हा गृहमंत्री होतो
आपल्या पंतप्रधानांनी दिल्लीत बैठक घेतली आणि 10 मिनिटांत निर्णय घेतला. आपल्या लष्कराच्या जवानांनी पाकिस्तानच्या भूमीवर सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांचा यशस्वीपणे खात्मा केला.

सभेला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दावा केला की
छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारने पूर्ण सहकार्य केले असते तर देशातील नक्षलवादी समस्या संपुष्टात आली असती. छत्तीसगड दीर्घकाळापासून डाव्या विचारसरणीच्या अतिरेकाशी झुंजत आहे. गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी कारवाईमुळे डाव्या विचारसरणीचा प्रभाव कमी होताना दिसत आहे.

छत्तीसगडमध्ये विशेषतः surgical strike
बस्तर भागात जबरदस्तीने धर्मांतराचे प्रकार वाढत असल्याचा आरोपही संरक्षणमंत्र्यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर केला. काँग्रेस सरकारने याला आळा घातला पाहिजे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, मी भारताच्या शेजारी देशांना सांगू इच्छितो की, भारताशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नका. भारताला डोळे दाखवण्याचा प्रयत्नही करू नका. आम्ही फक्त या बाजूने मारणार नाही, गरज पडल्यास त्या बाजूनेही येऊन मारण्याची ताकद आमच्यात आहे. आता भारत बदलला आहे.