आधुनिक भारताचे संरक्षण सामर्थ्य

#image_title

defence-make in India ‌‘मेक इन इंडिया‌’च्या माध्यमातून शस्त्रास्त्र निर्मितीत भारतीय तंत्रज्ञानाचा डंका वाजत आहे. अमेरिका, रशिया आणि चीनच्या तुलनेत भारत पिछाडीवर असला, तरी भारतीय तंत्रज्ञानाकडे जगाचा कल वाढत आहे. युक्रेनशी युद्ध सुरू असल्याने रशियावर अवलंबून असलेला आर्मेनिया भारताच्या आश्रयाला आला आणि अझरबैझानला भारतीय अस्त्रांच्या जोरावर गुडघे टेकण्यास भाग पाडले. आजपर्यंत भारत शस्त्रास्त्रांसाठी इतरांवर अवलंबून होता. परंतु, भाजपा सरकारने या क्षेत्रातही भारताला आत्मनिर्भर करण्याचा संकल्प केला आणि भारतीय संरक्षण प्रणालीने कात टाकली. भविष्यात युद्ध केवळ आकाश, जमीन अथवा समुद्रातच नाही, तर अवकाशातसुद्धा लढले जाणार आहे. त्यामुळे भारताने स्वत:च्या ताकदीवर परिणामकारक प्रणाली विकसित करून संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला.

defence-make in India यंदा सरकारने संरक्षण क्षेत्रासाठी ६.८१ लाख कोटींची तरतूद केली. अमेरिका, चीन आणि रशियाच्या तुलनेत भारताचे बजेट कमी असले, तरी कमी खर्चात उच्च दर्जाची संरक्षण क्षमता विकसित करण्यात भारताचा हातखंडा आहे. रशिया हा भारताचा मित्र देश आहे. त्यामुळेच अमेरिकेचा दबाव झुगारून भारताने रशियाकडून सर्वाधिक कच्चे तेल खरेदी केले. रशियाने भारताची सदैव पाठराखण केली आहे. चीनचे तगडे आव्हान निर्माण झाल्यानेच अमेरिकेने अलिकडे भारताशी जवळीक साधली आहे. कधीकाळी नरेंद्र मोदी यांना व्हिसा नाकारणारा अमेरिका आज त्यांचे गोडवे गात आहे! आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो, हे खरे असले तरी भारत मैत्रीभाव जपणारा देश आहे. पाकिस्तानशी झालेल्या युद्धावेळी बहुतांश जग जेव्हा भारताच्या विरोधात होते तेव्हा रशिया आणि इस्रायल हे दोनच देश भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते.

Nari Shakti Half page

defence-make in India राफेल ही लढाऊ विमाने भारताने फ्रान्सकडून खरेदी केलीत. परंतु, हे तंत्रज्ञान देण्यास फ्रान्स तयार नसल्याने भारताने स्वबळावर तेजस या जगातील सर्वाधिक हलक्या लढाऊ विमानाची निर्मिती करून इतिहास रचला. २००९ ते २०१३ या चार वर्षांच्या काळात भारतातील तब्बल ११ शास्त्रज्ञांचा संशयास्पद मृत्यू झाला. यातील बहुतांश मृत्यूमागील कारणांचा उलगडा झालेला नाही. ऊर्जा क्षेत्रात भारताला स्वयंपूर्ण करण्याच्या प्रकल्पावर हे शास्त्रज्ञ काम करीत होते. हा एक गोपनीय प्रकल्प असताना इतक्या शास्त्रज्ञांचा मृत्यू कसा काय होऊ शकतो, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे स्वाभाविक आहे. भारत आणि रशियाने मिळून तयार केलेल्या ब्रह्मोस या क्षेपणास्त्राचा वापर अद्याप रशियाने युक्रेन युद्धात केलेला नाही. यावरून या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ध्यानात घ्यावी.

अणुबॉम्बमुळे रासायनिक अस्त्रांची गरज संपुष्टात आल्याने भारताने १९९२ मध्ये रासायनिक शस्त्रास्त्र करारावर स्वाक्षरी केली. भारताकडे सध्या २०० च्या जवळपास अणुबॉम्ब असल्याचे सांगण्यात येते. जगात सर्वाधिक अणुबॉम्बचा साठा रशियाकडे आहे. आधुनिक अणुबॉम्बची क्षमता जपानवर टाकलेल्या अणुबॉम्बच्या तुलनेत हजारोपट आहे. त्यामुळे कोणताही देश अणुबॉम्बचा वापर करण्याची शक्यता वाटत नाही. परंतु, कारगिल युद्धात पाकिस्तानने भारतावर अणुहल्ला करण्याची तयारी केली होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना अमेरिकन राष्ट्रपतींनी पाकिस्तान भारतावर अणुहल्ला करणार असल्याची माहिती फोनवरून दिली. अटलजी डगमगले नाहीत आणि ‌‘पाकिस्तानने अणुहल्ला केलाच तर भारताचा एखादा भाग नष्ट होईल. परंतु, भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तान उद्याचा सूर्य पाहू शकणार नाही, इतकी हमी मी आपणास देतो!‌’ अशी गर्जना अटलजींनी केली आणि मग पाकिस्तानने मैदान सोडून पळ काढला.

defence-make in India रशिया-युक्रेन युद्धात छोटे छोटे आत्मघाती ड्रोन्स खूपच प्रभावी ठरले आहेत. असे आत्मघाती ड्रोन्स निकामी करणारी यंत्रणा भारताने झटपट विकसित करून संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. सध्या हे तंत्राज्ञान फक्त भारताकडे उपलब्ध आहे. ज्या छोट्या देशांना पुढारलेले देश शस्त्रास्त्र पुरविण्यास तयार नाही, असे सर्व देश आज भारताकडे आशेने पाहात आहे. भारतानेही अशा देशांना शस्त्रसज्ज करण्यास पुढाकार घेतला आहे. भारत हा जगातील सर्वाधिक शस्त्रास्त्र खरेदी करणारा देश आहे. परंतु, मेक इन इंडियाच्या माध्यमातून हे अवलंबित्व आता जवळपास १५ टक्क्यांनी कमी झाले आहे. भविष्यात शस्त्रास्त्र निर्मिती आणि निर्यातीत भारत एक प्रमुख देश म्हणून पुढे येऊ शकतो आणि त्या दिशेने युद्धपातळीवर काम सुरू आहे. भारताची शस्त्रास्त्र निर्मिती स्वसंरक्षणासाठी आहे आणि या क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करणे, हीच देशाच्या संरक्षणाची हमी आहे.

– पुंडलिक आंबटकर
९८८१७१६०२७