नंदुरबार : भारतीय जनता पार्टीने संसदरत्न डॉ. हिना गावित यांना नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. अक्कलकुवा-धडगाव विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार संसदरत्न डॉ. हिना विजयकुमार गावित यांनाच उमेदवारी दिली जावी; असा सूर तोरणमाळ धडगाव अक्कलकुव्यापासून खापरपर्यंतच्या विविध गावांमधून उमटत आहे.
सातपुडा रांगेत धडगाव तालुक्यातील सर्वात उंच शिखर म्हणून अस्तंबा ऋषींचे शिखर आहे. दिवाळीच्या धनत्रयोदशीपासून अस्तंबा यात्रेसाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातून भाविक हजारोच्या संख्येने येतात. या भाविकांना आपली यात्रा सुलभ व सोयीस्कर व्हावी. म्हणून डॉ. विजयकुमार गावीत यांनी पहिल्यांदाच या शिखरावर भाविकांना जाण्यासाठी
रस्ता व पाय-या करणेकामी आदिवासी विकास विभागामार्फत २ कोटी २० लक्ष रुपये मंजूर केले असून देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच या दुर्गम भागाला न्याय मिळाला. एवढेच नाही तर माईल स्टोन म्हणावे असे हे विकास काम पॉलिटिकल मास्टर स्ट्रोकसुद्धा ठरले आहे ज्याच्यामुळे या दोन्ही दुर्गम तालुक्यातील लोकांमधून ‘आपला आमदार असावा तर असा’ ही भावना जबरदस्त स्वरूपात उमटली.
मागील काही वर्षापासून अक्कलकुवा-धडगाव तालुक्यात मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आणि खासदार पदी कार्यरत असताना संसद रत्न डॉ. हिना गावित यांनी केलेली या स्वरूपाची विकास कामे लोकांच्या मनात घर करून आहे. मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजना आणि विविध विकास निधीच्या म ाध्यमातून याच्यापूर्वी कधी झाले नाही इतके रस्ते दुर्गम भागासाठी डॉ. हिना गावित यांनी मंजूर करून आणले. यासह त्यांनी केलेली असंख्य विकास कामे आहेत ज्यामुळे धडगावच्या दुर्गम भागात निराळा विश्वास निर्माण झाल्याचे म्हटले जाते. आदिवासींना न्याय देणारा असा विकास गावित परिवारच करू शकतो; असा दावा अक्कलकुवा धडगाव धील मतदार करू लागले असून धडगाव अक्कलकुवा तालुक्यात विकासात्मक परिवर्तन हवे असेल तर डॉ. हिना गावित यांना विधानसभेची उमेदवारी दिली जावी, अशी मागणी अक्राणी मतदारसंघातील जनतेतून होत आहे.
त्या भागातील काँग्रेस विरोधी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे की, वास्तविक अक्कलकुवा धडगाव-विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री अॅड. के. सी. पाडवी सलग ३५ वर्षापासून निवडून येत आहेत. परंतु त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराज असलेल्या जनतेच्या प्रतिक्रिया आहेत. त्यांच्या या दीर्घ राजकीय वाटचालीचा दोन्ही तालुक्यांना म्हणावा तसा लाभ झालेला नाही. आता खासदारपदी निवडून आलेले त्यांचे चिरंजीव अॅड. गोवाल पाडवीसुद्धा स्थानिक जनतेशी अद्याप हवा तसा संवाद साधताना दिसले नाही. परिणामी समस्याग्रस्त आदिवासींमध्ये नाराजी आहे हे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. या भागाचा विकास साधण्यासाठी अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघातून डॉ. हिना गावित यांना उमेदवारी दिली जावी, अशी स्थानिक जनतेतून मागणी होत आहे.