---Advertisement---
जळगाव : राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यासाठी १७ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येता आहेत. त्यांचा हा दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
रविवारी, १७ ऑगस्ट रोजी अजित पवार जळगाव शहरात सुमारे ६ ते ७ तासा थांबणार आहेत. यावेळेत ते काही शासकीय कामांसह महत्त्वाच्या राजकीय बैठका आणि मेळाव्यांना उपस्थिता राहणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिली.
अजित पवार यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री म्हणून जळगाव जिल्ह्याला तीन भेटी दिल्या आहेत, परंतु त्या सर्व शासकीय कामांसाठी होत्या. पक्षातील फुटीनंतर ते प्रथमच पक्ष संघटनेच्या कामासाठी जिल्ह्यात येता असल्याने, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या दौऱ्यादरम्यान काही नवीन पक्षप्रवेश देखील होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजया पवार यांनी दिली.