नागपूर हे देशाचे हृदयस्थळ म्हणून ओळखले जाते. हे शहर प्रागतिक आणि विकसित अशा महाराष्ट्राची उपराजधानी आहे. नागपूर आधी गोंड राजाची आणि नंतर सी. पी. अॅण्ड बेरारची राजधानी होती. त्यामुळे उपराजधानीचे शहर असूनही देशाच्या अन्य महानगरांच्या आणि विविध राज्यांच्या राजधानीच्या तुलनेत नागपूरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. Vidarbha Development राजधानीच्या शहरांप्रमाणे नागपूरला विधानसभा आहे, उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे तसेच रिझर्व्ह बँकही आहे. राजधानीच्या शहरात असणारी सर्व शासकीय, निमशासकीय तसेच विविध कॉर्पोरेट कंपन्यांची आस्थापने नागपुरात आहेत. याचे कारण महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या दृष्टीनेही नागपूरचे आगळेवेगळे महत्त्व आहे. शून्य मैलाचा ऐतिहासिक असा दगडही नागपुरात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाला हिंदुत्वाची आणि राष्ट्रीयत्वाची शिकवण देणार्या आणि राष्ट्रभक्त नागरिक निर्माण करणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूरला आहे. आणखी महत्त्वाचे म्हणजे भाजपाचे दोन धडाडीचे नेते नागपूरचे आहेत. विकासपुरुष अशी ओळख असलेले नितीन गडकरी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री म्हणून राष्ट्रीय राजकारणात म्हणजे दिल्लीत आपली छाप पाडत आहेत, तर तडफदार असे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून मुंबई गाजवत आहेत. त्यामुळे नागपूरच्या विकासाबाबत बोलायचेच कारण नाही. परदेशातील शहरांना लाजवेल असे नागपूर शहर गडकरी आणि फडणवीस या जोडीने घडविले आहे. गडकरी यांनी नागपुरात एम्स, आयआयएम यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्था आणल्या. लाईट आणि म्युझिक शोसोबत फुटाळा तलावाचे जे सौंदर्यीकरण गडकरी यांनी केले ते पाहून आपण नागपुरात राहतो, यावर क्षणभर विश्वासच बसत नाही. आपण परदेशात असल्याचाच भास पाहणार्याला होतो. याचे सर्व श्रेय गडकरी यांना द्यावे लागले.
विकास कशाला म्हणतात आणि एखाद्या शहराचा विकास कसा करायचा, हे नागपूरला येऊन अन्य राज्यातील नेते पाहून जातात. याचा अर्थ या दोघांनी फक्त नागपूरचाच विकास केला, विदर्भातील वा महाराष्ट्रातील अन्य शहरांकडे विकासाच्या बाबतीत दुर्लक्ष केले, असे म्हणणे अन्यायकारक होईल. गडकरी आणि फडणवीस यांनी नागपूरच्या विकासाला जेवढे प्राधान्य दिले तेवढेच वा त्यापेक्षा काकणभर जास्त प्राधान्य विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाला दिले आहे. गडकरी यांनी तर देशाच्या कानाकोपर्यात रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, पूल, भुयारी मार्ग, बोगदे यांचे जाळे विणले. फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे स्वप्न पाहिले होते. आता उपमुख्यमंत्री असताना त्यांचे हे स्वप्न साकार झाले आहे. या समृद्धी महामार्गाचे रविवारी 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे, ही फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीच नाही तर संपूर्ण विदर्भवासीयांच्या दृष्टीने स्वप्नपूर्तीची तसेच अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणावी लागेल. नागपूर-मुंबई हा महामार्ग फक्त रस्ता नाही तर तो Vidarbha Development विदर्भाच्या विकासाचा आणि नावाप्रमाणाचे समृद्धीचा महामार्ग ठरणार आहे, यात शंकाच नाही. हा महामार्ग अनेक जिल्ह्यातून तसेच शंभरांवर गावातून जात आहे. महामार्गाच्या दुतर्फा असणार्या गावात यानिमित्ताने विकासाची गंगा पोहोचणार आहे; खर्या अर्थाने तेथे समृद्धी येणार आहे. नागपूरचा जो विकास या दोघांनी केला तो एकांगी नाही तर सर्वांगीण आहे. त्यामुळे देशातील अन्य शहरांना आता नागपूरचे आकर्षण आणि हेवाही वाटू लागला आहे. गडकरी यांनी नागपुरात मेट्रो आणली. नागपुरात मेट्रो आणण्याचा विचार जेव्हा गडकरींनी मांडला तेव्हा नागपुरात मेट्रोची काय आवश्यकता आहे, असे म्हणणारे कमी नव्हते. मात्र, नागपुरात मेट्रोचे काम झाल्यानंतर तसेच त्याची स्थानकं पाहिल्यानंतर गडकरींच्या विकासाच्या दृष्टीची आपल्याला कल्पना येऊ शकते. विकासाची जी दृष्टी गडकरींजवळ आहे, ती देशातील काही मोजक्या नेत्यांजवळ आहे. त्यामुळेच तुम्ही लोकांना डोळे देऊ शकता, दृष्टी देऊ शकत नाही, असे उगीच म्हणत नाही.
गडकरी विकासाच्या बाबतीत आजचा नाही तर उद्याचा म्हणजे भविष्यकाळाचा विचार करीत असतात. Vidarbha Development नागपूर मेट्रोच्या 43.8 किमीच्या दुसर्या टप्प्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. नागपूर मेट्रोच्या दुसर्या टप्प्यात 30 स्थानके राहणार असून यासाठी 6708 कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे. मेट्रोच्या दुसर्या टप्प्याने कामठी, कन्हान, दत्तवाडी, पारडी, बुटीबोरी एमआयडीसी आणि हिंगणा एमआयडीसी हे भाग नागपूरशी जोडले जाणार आहेत. 2024 पर्यंत नागपूर मेट्रोची प्रवासी संख्या 5.5 लाख राहणार असून 2031 मध्ये 6 लाख 30 हजार तर 2041 मध्ये 7 लाख 70 हजारापर्यंत जाईल, अशा अंदाजाने मेट्रोच्या दुसर्या टप्प्याचे नियोजन करण्यात आले आहे. मेट्रो ही कोणत्याही महानगराची गरज असते. आज आपण लोकलशिवाय मुंबईचा विचार करू शकत नाही. लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. काही मिनिटांसाठी जरी लोकल बंद पडली तर मुंबई ठप्प होऊन जाते. लोकल आणि मेट्रोसारख्या वेगवान प्रवासी वाहतुकीच्या सुविधा नसत्या तर दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता यासारख्या शहरांचे काय झाले असते, याची कल्पनाही करवत नाही. त्यामुळे जो नेता भविष्यकाळाचा विचार करून विकास कामांचे नियोजन करतो, त्याला नितीन गडकरी म्हणत असतात. आज कदाचित नागपुरात मेट्रोची तेवढी गरज कोणाला भासत नसेल, पण काही वर्षांनी नागपूरची लोकसंख्या वाढेल, अनेक मोठे उद्योग नागपुरात आलेले असतील, त्यावेळी गडकरींनी नागपुरात मेट्रो आणल्याबद्दल लोक त्यांचे नाव घेतील, त्यांना धन्यवाद देतील, यात शंका नाही.
नदी ही कोणत्याही गावाची ओळख असते. आपल्याकडे नद्यांना तसेही लोकमातांचे स्थान देण्यात आले आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉरमुळे आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविलेले वाराणसी शहर गंगा नदीमुळे, भव्य असे राममंदिर उभारले जात असलेले अयोध्या शरयू नदीमुळे, आधी अलाहाबाद आणि आता प्रयागराज म्हणून ओळखले जाणारे शहर गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे तर लखनौ गोमती नदीमुळे ओळखले जाते. तशी नागपूरची ओळख नाग नदीमुळे व्हावी, अशी सगळ्यांची इच्छा आहे. पण आज नागपुरातील नाग नदीची अवस्था पाहिल्यावर हिला नदी का म्हणतात; नाला का म्हणत नाही, असा प्रश्न सर्वांना पडतो. Vidarbha Development आता या नाग नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे गडकरी यांनी ठरविले आहे. गडकरी जे ठरवतात ते करून दाखवतात. ही त्यांची खासियत आहे. त्यामुळे नागपुरातील नाग नदी उद्या अहमदाबाद शहरातील साबरमतीसारखी झाली आणि नाग नदीकडे पाहून लोकांना लंडनमधील थेम्स नदीची आठवण आली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. नाग नदीतून स्वच्छ