Devendra Fadnavis : यांची मोठी घोषणा, ‘नार-पार’च्या टेंडरला दिली मान्यता

जळगाव : नार-पार गिरणा योजनेच्या टेंडरला मान्यता दिल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित येथे आज रविवारी ‘लखपती दीदी’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, राज्यमंत्री प्रतापराव जाधव, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आदी उपस्थित होते.

नार-पार गिरणा योजनेमुळे जळगाव जिल्ह्याचे चित्र बदलणार असून, शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळणार आहे.  मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या योजनेला आम्ही मान्यता दिली आहे. आजच कॅबिनेटमध्ये आम्ही त्याला टेंडर काढण्याची मान्यता देतो आहोत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

जळगाव जिल्हा सुजलाम-सुफलाम करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतो आहे. वाघूर प्रकल्पाला 2288 कोटी, पाडळसे प्रकल्पाला 4890 कोटी, अशाप्रकारे शेतकऱ्याला ही सुजलाम-सुफलाम करण्याचं काम आपण या माध्यमातून करतोय, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.