---Advertisement---

उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार

by team
---Advertisement---

मुंबई :  शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर आता महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळेच ते अशा गोष्टी बोलत आहेत. मात्र अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख म्हटले होते. आज त्यांनी आपल्या भाषणातून हे सिद्ध केले.

ते म्हणाले की, उद्धव यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, निराशेतून ते असे बोलत आहेत. अशा हतबल व्यक्तीच्या वक्तव्याला काय प्रतिसाद द्यायचा? जर एखाद्याने निराशेने आपला तोल गमावला आणि मूर्खपणा केला तर त्याला उत्तर दिले जात नाही.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य असल्याचे अमित शहा म्हणाले होते ते आज त्यांनी सिद्ध केले आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीबाबत राजकारण तापले आहे. सर्वत्र विधाने होताना दिसत आहेत.

दरम्यान, शिवसेनेचे उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी शनिवारी एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी अनुद्गार काढले होते.  याआधी उद्धव ठाकरे म्हणाले की, मी मुंबईत म्हटल्याप्रमाणे ‘एकतर तू राहशील ना मी’. मी पुन्हा म्हणतो, “एकतर तू राहशील किंवा मी राहीन.”

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment