जळगाव : देशाच्या विकासाची निवडणूक आहे .विरोधकांच्या भाषणांमध्ये गरीब,, शेतकरी, सामान्य माणसाच्या विकासाचे मुद्दे नाहीत.फक्त शिविगाळ आहे. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते, गुरुवार, २५ रोजी महायुतीच्या उमेदवारांच्या नामांकन प्रसंगी आयोजित सभेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांमध्ये 25 कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढलं, हा जगातला रेकॉर्ड आहे. जगामध्ये कुठल्याही देशांमध्ये मात्र दहा वर्षांमध्ये 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या बाहेर आजपर्यंत आले नाही. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये 30 कोटी लोक जे कच्च्या घरात राहायचे त्यांना पक्क घर दिल पन्नास कोटी लोक त्यांच्या घरामध्ये गॅस नव्हता, त्यांना गॅस दिला. 55 कोटी लोकांच्या घरामध्ये शौचालय नव्हतं त्यांना शौचालय दिले. साठ कोटी लोक त्यांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी नव्हतं त्यांच्या घरी स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचलं 55 कोटी लोकांना आयुष्यमान भारतच्या अंतर्गत त्या ठिकाणी मोफत इलाज दिला. साठ कोटी लोकांना तरुणांना मुद्राच्या अंतर्गत लोन दिल. दहा लाखापर्यंतचा लोन मिळाल. तारण नाही गॅरंटर नाही. या 60 कोटी मध्ये 31 कोटी आमच्या आया बहिणी आहेत की ज्यांना ते लोन मिळाल आणि ते आपल्या पायावर या ठिकाणी उभ्या राहिल्या. .या देशामध्ये 80 लाख बचत गट तयार झाली आणि त्याला 8 लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले. आता मोदीजींनी सांगितलं एकीकडे मुद्राचं लोन दहा लाखावरून वीस लाख होईल आणि आमच्या महिला बचत गटांना ज्या वस्तू त्या तयार करतात त्या वस्तूचा एअरपोर्ट असेल, रेल्वे स्टेशन असेल, बस स्टेशन असेल सर्व ठिकाणी त्यांच्या करता जागा आरक्षित ठेवली जाईल आणि त्यांच्या वस्तूंची विक्री होईल. मोदीजी म्हणतात जेव्हा एक पुरुष आपल्या पायावर उभा राहतो तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण जेव्हा महिला पायावर उभी राहते. पूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून महिलांच्या सक्षमीकरणाकरता आज मोदीजींनी प्रयत्न सुरू केले. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी किसान सन्मान निधी दिला. आता पुन्हा आपल्या सरकारमध्ये मोदीजींच्या आशीर्वादाने आपल्या महाराष्ट्राला 26000 कोटी रुपये सिंचना करता मिळाले आहेत आणि शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करतोय सर्वसामान्य माणसाचं काम करत असताना या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे.