मोठी बातमी ! देवेंद्र फडणवीसांनी घेतला पहिला निर्णय, वाचा काय आहे ?

मुंबई : देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळ, एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक उद्योगपती, कलाकार आणि इतर व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी शपथ घेण्यापूर्वी बाळासाहेब आणि आनंद दिघेंचं स्मरण केलं. यानंतर दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी देखील पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. तिन्ही नेत्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद घेतले.

फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ
देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, ते दक्षिण नागपूरचे आमदार आहेत. यापूर्वी 2014 मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते, त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत ते काही दिवस मुख्यमंत्री होते. यानंतर महायुतीची आघाडी झाली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर फडणवीस उपमुख्यमंत्रीपदावर राहिले.

आठवडाभरानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो
सध्या महाराष्ट्रात केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांनाच शपथ गेली आहे. आठवडाभरात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे मानले जात आहे. महायुतीतील मित्रपक्षांचे मंत्री आठवडाभरात शपथ घेतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.

काय आहे निर्णय ?
महाराष्ट्रात शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोड मध्ये दिसले. शपथ घेतल्यानंतर ते थेट सचिवालयात गाठले. येथे मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी रुग्णाला मदत करण्याचा पहिला निर्णय घेतला. या निर्णयानुसार रुग्णाला बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी मुख्यमंत्री निधीतून ५ लाख रुपये दिले जाणार आहेत.