Devendra Fadnavis : राज्यातील सत्तास्थापनेचा पेच दोन आठवड्यांनंतर सुटला असून, भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. फडणवीस यांच्या नावाची बुधवारी महाराष्ट्र भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने नेमणूक करण्यात आली. विशेषतः भाजपकडून महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. या सोहळ्याच्या आयोजनासाठी जोरदार तयारी केली जात आहे.
फडणवीसांबद्दल जाणून घ्या ‘या’ गोष्टी
देवेंद्र फडणवीस हे वयाच्या ४४व्या वर्षी पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्राचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरले होते. फडणवीस हे १९९२ मध्ये २२व्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आले, त्यानंतर पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर १९९७ मध्ये २७व्या वर्षी सर्वांत तरुण म्हणून नागपूरचे महापौर झाले होते.
– भाजपशी संलग्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे सक्रिय सदस्य
– महापालिकेची पहिली निवडणूक रामनगर प्रभागातून जिंकली
– नागपूर महानगरपालिकेचे १९९७ मध्ये सर्वांत तरुण महापौर आणि भारतातील दुसरे सर्वांत तरुण महापौर बनले
– भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्षपदी २०१३ मध्ये निवड
– विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीनंतर विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड
– ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी मुख्यमंत्रिपदी विराजमान
– २०१४ ते २०१९ असा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री
– उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळात शिवसेनेत बंडखोरी
– शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी भाजपचा हात धरला
-शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आल्यानंतर फडणवीस उपमुख्यमंत्री झाले
– यंदाची म्हणजे २०२४मधील निवडणूक भाजपने फडणवीस यांच्या नेतृत्वात लढली
– अतिशय सूक्ष्म नियोजन करीत त्यांनी राज्यभर दौरे केले
भूषवलेली पदे
– १९८९ भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरमधील वॉर्ड अध्यक्ष
– १९९९ ते आजतागायत – विधानसभा सदस्य
– १९९२ ते २००१ सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, दोन वेळा नागपूरचे महापौर
– १९९४ भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष
– २००१ भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
– २०१० भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस
– २०१३ भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष
– २०१४ ते २०१९ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
– २०१९ ते जून २०२२ महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते
– जून २०२२ ते २५ नोव्हेंबर २०२४ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री
विधिमंडळातील कार्य-
-१९९९ पासून ते आतापर्यंत विधिमंडळात आमदार
-अंदाज समितीचे सदस्य
-नगरविकास व गृहनिर्माणाविषयीच्या स्थायी समितीचे सदस्य
-नियम समितीचे सदस्य
-महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य
-राखीव निधीविषयी संयुक्त निवड समितीचे सदस्य
-सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य
-स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलच्या संयुक्त निवड समितीचे सदस्य