---Advertisement---
भुसावळ : सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी शहरवासी सज्ज झाले आहे तर तरुणाईची वाढती गर्दी पाहता शहरातील हॉटेल्स, रेस्टारंट व बार, ढाब्यांवरही बसण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषतः तळीरामांनी आतापासून नववर्ष स्वागतासाठी स्थळ निश्तिची केली आहे मात्र झिंगाट तळीरामांमुळे होणारे अपघात व अप्रिय घटना पाहता पोलिस मात्र ३१ डिसेंबरच्या रात्री रस्त्यावर उतरून तळीरामांवर कारवाई करणार आहेत. शहर, बाजारपेठ व तालुका हद्दीत प्रभावीपणे कारवाई केली जाणार आहे. मध्यपींची वाहने तपासणीसाठी मोठा बंदोबस्त ३१ डिसेंबरच्या रात्रीनंतर रस्त्यावर तैनात राहणार आहे.
हॉटेल्स, ढाब्यांवर रोशनाई नववर्षाच्या स्वागतासाठी काही तासांचा अवधी उरल्याने ठिकठिकाणी नववर्षाच्या सेलिब्रेशनचे बेत आखले जात आहेत. थर्टी फर्स्टची रात्र गाजवत मद्याचे ग्लास रिचवणाऱ्या तळीरामांनीही आतापासूनच आपल्या ‘स्टॉक’ची जुळवाजुळव सुरू झाली असून शहरातील शहरातील विविध हॉटेल, परमीट रूम, बिअरबार यांनी ग्राहकांसाठी विशेष बैठक व्यवस्था करीत रोशनाई देखील केली आहे. करण्यात आली आहे.
चार हजार परवाने वितरीत
शहरातील मद्य विक्रीच्या दुकानांमध्ये सुमारे चार हजार मद्याचे परवाने देण्यात आले आहेत तसेच परवाना असल्यावरच मद्य देण्याच्या सक्त सूचना राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुकानदारांना दिल्या आहे. विना परवाना कोणाला मद्याची बाटली दिल्याचे आढळल्यास दुकानदारांवर कारवाई होणार आहे. हॉटेलमध्ये, शेतांमध्ये घराच्या गच्चीवर, मोकळ्या मैदानात, मंगल कार्यालयात ३१ डिसेंबरला गेटदु गेदर करीत नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे.
पहाटे एक वाजेपर्यंत मिळणार मद्य
३१ डिसेंबरला एका दिवसासाठी शासनाकडून वाईन शॉप, परमीट रूम, बिअरबार, बिअर शॉपी, देशी दारूचे दुकान हे रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. रात्री एकला सर्वच दुकाने बंद होणार आहे.
भुसावळात शहरात मोठ्या प्रमाणावर बिअर, बार व राष्ट्रीय महामार्गावर ढाबे असून तेथेदेखील विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
ढाब्यांवर अवैधरित्या मद्य पितांना ग्राहक आढळल्यास त्यांच्याविरूध्द कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आला आहे
अप्रिय प्रकार रोखण्यासाठी आठ ठिकाणी नाकाबंदी
मद्य प्राशन केल्यानंतर होणारे वाहन अपघात पाहता अप्रिय घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने यंदा चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. तीन्ही पोलीस ठाण्यांसोबतच शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडूनही मद्यपींवर कारवाई होईल. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाहाटा चौफुली, अष्टभुजा देवी मंदिर परिसर, बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर आणि स्टेशन चौकी, खडका चौफुलीजवळ तसेच शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांधी पुतळा, यावल नाका, जळगाव वाय पॉइंट, हंबर्डीकर चौक येथे नाकाबंदी राहणार आहे.
चेक पोस्टवर होणार तपासणी
थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरासह तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहा भरारी पथके रात्री गस्त करणार आहे. अवैध दारू विक्री, बनावट दारू विक्री यावर आळा घालण्यासाठी हे पथक धडक कारवाई करतील. विशेष म्हणजे मुक्ताईनगर व ब-हाणपूरजवळील चेकपोस्टवर विशेष पथकाच्या माध्यमातून तपासणी होईल