Dhanjay Munde on Anjali Damania: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाराचे गंभीर आरोप केले आहेत.
समाजवादी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांचा आरोप आहे की, मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 161.68 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले, तसेच त्यांनी मुंडे यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी केली.
धनंजय मुंडे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अंजली दमानियांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले. तसेच त्यांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. “जी प्रक्रिया राबवली गेली ती पूर्व मान्यतेनेच राबवली गेली. त्यामध्ये विविध कंपन्यांकडून स्पर्धात्मक दर मागवले होते. त्यात जास्तीत जास्त कंपन्यांनी यात सहभागी व्हावे म्हणून निविदा प्रक्रियेला दोनदा मुदत वाढ दिली. कोणी दोन वेळा मुदत वाढ देईल का?” असा सवाल धनंजय मुंडेंनी केला.
”महाराष्ट्रातील ४ लाख शेतकऱ्यांना नॅनो खत मिळाले आहे. पण दमानिया यांचे केवळ सनसनाटी निर्माण करणे सुरु आहे. त्या नुसत्या धांदात खोटे आरोप करत आहेत. शेतकऱ्याला कधी पेरणी करावी लागते? त्यासाठी काय लागते? हे अंजली दमानिया यांना माहिती नाही,” असा सवाल मुंडे यांनी केला. खोटे बोलणे आणि सणसनाटी निर्माण करणे दमानिया यांनी सोडून द्यावे, असेही ते म्हणाले.
माझं मीडियाला चॅलेंज आहे. अंजली बदानमियांनी बदनामी करण्यापलिकडे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात देशात कुठे तरी टिकलाय का. सत्य झाला का? असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला.
तसच आम्ही शांत बसलो असं कुणी समजू नका. आम्हाला बोलता येत नाही. आमच्याकडे काहीच नाही असं समजू नका. बीडमध्ये भयंकर घटना घडली आहे. ही संवेदनशील घटना आहे. हत्यारांना फासावर लटकवणं जबाबदारी आहे. यातून वादावर वाद नको म्हणून गप्प बसतो. एक विषय झाला तर दुसरा विषय. काय करायचयं? माझी अंजली ताई बदनामीया यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचा काम ज्याने कुणी दिलं असेल त्यांना व अंजली दमानियांना माझ्याकडून शुभेच्छा आहे. असा टोलाही त्यांनी लगावला.