Dhanush-Nayantara: दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि अभिनेत्री नयनतारा यांच्यातील फुटेजच्या वापरावरील वाद आत्ता थेट कोर्टापर्यंत पोहचला आहे. धनुषने नयनतारा विरुद्ध दिवाणी खटला दाखल केला आहे. यांच्यातील नेटफ्लिक्स डॉक्युमेंट्री ‘नयनतारा- बियॉन्ड द फेरी टेल’ चा हा वाद आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये धनुषचा चित्रपट नानुम राउडी धान मधील काही सेकंदाचे क्लिप वापरण्यात आल्याचा दावा केला आहे.. नयनतारा आणि तिचे पती विघ्नेश सिवन यांच्या विरोधात त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.
धनुषची प्रोडक्शन हाऊस कंपनी वंडरबार फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडने नयनतारा, विघ्नेश आणि त्यांची कंपनी राउडी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. डॉक्युमेंट्री नयनतारा- बियॉन्ड द फेरी टेल रिलीज करण्यात आले आहे. या सीरीजमध्ये धनुषच्या प्रोडक्शन हाऊसअंतर्गत चित्रपट नानुम राउडी धानचा एक ३ सेकेंदाचा क्लिप वापरण्यात आले आहे. कॉपीराईट्स वरून धनुषने नयनताराच्या टीमला नोटिस पाठवली आहे.
नयनतारा यांच्याकडून उत्तर मागितले
या प्रकरणी मद्रास हायकोर्टाने दोन्ही पक्षांचा प्राथमिक युक्तिवाद ऐकून घेत तो मंजूर केला. आता नयनताराला पुढील सुनावणीला नोटीसला उत्तर द्यावे लागणार आहे.
काय आहे वाद?
अलीकडेच नयनताराने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक मोठे खुले पत्र शेअर केले आहे. धनुषला लिहिलेल्या या पत्रात अभिनेत्रीने धनुषवर तिला व्हिज्युअल्स वापरू देत नसल्याचा आरोप केला आहे. नयनताराने दावा केला की व्हिज्युअलला मान्यता न मिळाल्यानंतर तिने डॉक्युमेंटरी संपादित केली आणि चित्रपटाशी संबंधित कोणतेही फुटेज वापरले नाही. तिने सांगितले की, धनुषने तीन सेकंदांचे व्हिज्युअल वापरल्याबद्दल तिला 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली होती.
नानुम राउडी धान हा तमिळ चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला होता. त्यात नयनतारा आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन विघ्नेश शिवन यांनी केले होते. या चित्रपटादरम्यान विघ्नेश शिवन आणि नयनतारा जवळ आले आणि दोघांनी 2022.मध्ये लग्न केले.