---Advertisement---
Dharangaon News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २० जून रोजी धरणगाव शहरात येत असून, त्यांच्या हस्ते क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे उद्घाटन होणार आहे. तसेच धरणगाव येथील चोपडा रस्त्यावरील उपजिल्हा रुग्णालयाचासुद्धा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते होईल, अशी माहिती जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दि. १३ जून रोजी धरणगाव येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन आदी मान्यवर उपस्थित राहतील.
बैठकीस प्रामुख्याने भाजपचे ज्येष्ठ नेते डी. जी. पाटील, सुभाष पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जळकेकर महाराज, शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, भाजप उपजिल्हाप्रमुख संजय महाजन, राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक भाजपचे माजी तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन युवा सेनेचे भैया मराठे यांनी केले. पी. सी. पाटील, गजानन पाटील, देविदास पाटील, मुकुंद नन्नवरे, शिवराज पाटील, पवन सोनवणे, भानुदास विसावे, राजू चव्हाण, भाजपा महिला जिल्हा सरचिटणीस प्रमिला रोकडे, तुषार महाजन, भाजप तालुकाप्रमुख दिनेश पाटील, शहरप्रमुख दिलीप महाजन, विलास महाजन यांच्यासह शिवसेना भाजप महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.