Sakre Vidyalaya Dharangaon : तालुक्यातील बाळकृष्ण चत्रभुज शेठ भाटीया माध्यमिक विद्यालय साकरे या शाळेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात131 गुण मिळवून धरणगाव तालुक्यात प्रथम क्रमांकाच बक्षिस पटकवल आहे.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमात विद्यालयातील शिक्षक किशोर पाटील, मनोज गुजर श्रीमती मनिषा शिंदे, लिलाधर माळी नरेंद पटाईत राजेश्वर न्हायदे दशरथ सांळुखे अनिल पाटील यशस्वीपणे काम करून131 गुण मिळाले तसेच विद्यालयाचे अध्यक्ष मा. दिलीप दादा पाटील व संचालक मंडळ यांचे अनमोल मार्गदर्शन व प्रेरणेणे आज तालुक्यात प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झालेले आहे.
सन २०२४ २५ या शैक्षणिक वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभियानार्गंत मुख्यमंत्री ‘ माझी शाळा सुंदर शाळा ‘ हा उपक्रम विद्यालयाचे अध्यक्ष दिलीप पाटील तसेच मुख्यध्यापिका सौ. अनिता पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन विद्यालयाला १३१ गुण मिळाले व तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले. कार्यक्रमाच्या बक्षिस वितरण संभारभात तीन लाख रुपये व प्रशस्तीपत्र मिळणार आहे.