वेध
– विजय निचकवडे
cow India गाय आमच्यासाठी पूज्य आहे. असंख्य देवतांचा वास तिच्यात असतो म्हणून ती आमच्यासाठी माता आहे. मात्र, हीच गाय समृद्धीचा मूळ स्रोतही असू शकते, या दृष्टीनेही विचार व्हायला हवा. cow India गाईचे पूजनीय असे स्थान अढळ आहे. मात्र, तिची वेगळी ओळख आणि त्या माध्यमातून समृद्धीचा मार्ग उजागर होत असेल तर असाही विचार केलाच जाऊ शकतो. आज गाईचे दूध, शेणाचे खत आणि गोमूत्राचे औषध इथपर्यंतच आम्ही मजली गाठली असताना आणखी व्यापक विचार झाल्यास अथर्ववेदातील ‘धेनु सदानाम रईनाम’ हे संबोधन खरे उतरेल. cow India हिंदू संस्कृती सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक आहे. आम्ही पशुपक्षी, प्राणी, वृक्षाचीही पूजा करण्याचा वारसा जपतो आहोत. गाय तर आमच्यासाठी माता आहे. गोमाता म्हणून तिच्या संवर्धनाचा वसाच आम्ही घेतला आहे. cow India पण केवळ मातेचा दर्जा असल्याने तिचे संवर्धन करायचे, की गोमातेकडे समृद्धीचे मूळ स्रोत म्हणूनही पाहायचे, हे आता ठरवावे लागेल. गाईच्या संवर्धनासाठी कायदे आहेत.
cow India गाईंची कत्तल किंवा वाहतूक चुकीच्या पद्धतीने होत असेल तर शिक्षेची तजवीज आहे. पण याची गरज का पडावी, हाच प्रश्न आहे. गाईचे संवर्धन आमच्या अंगणात होत असेल तर गोतस्करीसारखे प्रकार आपोआपच थांबले जाऊ शकतील. सुदैवाने लोकांमध्ये गाईबद्दल निर्माण झालेली आत्मीयता म्हणा किंवा बदललेल्या शासनाकर्त्यांच्या भूमिकेमुळे म्हणा, आज गोसंवर्धन हा विषय तेवढाच महत्त्वाचा झाला आहे. cow India केवळ गाईला देवता म्हणून पूजन करून आम्ही मोकळे व्हायचे की अथर्ववेदातील ‘धेनु सदानाम रईनाम’ म्हणजे गाय समृद्धीचा मूळ स्रोत हे खरे ठरवायचे, याचा विचार करावाच लागेल. आज आम्ही गाईचे दूध, त्यापासून मिळणारे पदार्थ, शेणाचे खत आणि गोमूत्राचे औषध इथपर्यंत मर्यादित आहोत. cow India याही पलीकडे जाऊन विचार करीत जयपूर येथील व्यापारी भीमराज शर्मा यांनी गाईच्या शेणापासून कागद तयार केला. ते यावरच थांबले नाहीत तर लिफाफे, डायरी, पेन्सिल, गुलाल, छोटे हवनकुंड, राख्या अशा एक नव्हे १०० हून अधिक वस्तू तयार केल्या.
कोट्यवधी रुपयांची उलढाल या व्यवसायाने होत आहे. cow India आज डायरी, बॉक्स, पेन्सिल, सजावटीच्या वस्तू अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशात निर्यात होत असतील तर यापेक्षा आमच्या गोमातेचा गौरव कुठला असू शकतो. भीमराज यांना गाय समृद्धीचा मूळ स्रोत आहे, हे समजले. cow India म्हणूनच कदाचित त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला वाव देत जवळपास १०० वस्तूंच्या निर्मितीचे धाडस केले आणि धाडसाला प्रतिसादही मिळाला. यातून अर्थार्जनाचा मार्ग तर मोकळा झालाच; पण ख-या अर्थाने अशा प्रयत्नातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालनाही मिळेल, यात शंकाच असायला नको. cow India आज शर्मा यांनी जे केले, ते आमच्या ग्रामीण भागातील कष्टक-यांना का शक्य नाही? १०० वस्तू तयार करण्याची आज आमची क्षमता नसेल, पण कुठेतरी या सकारात्मक दृष्टिकोनतून पाऊल पुढे पडायला हवे. नोकरी नाही, व्यवसाय उभारण्यासाठी भांडवल नाही याच चर्चांच्या गु-हाळात स्वतःला ठेवण्यापेक्षा प्रयत्नांचा श्रीगणेशा करायला हरकत काय? cow India हे करण्यासाठी आधी आमची मानसिकता बदलायला हवी. गोवंशाचे संवर्धन घरोघरी व्हायला हवे.
cow India खुंटाला बांधलेली गाय कसायाला विकण्याआधी जर आमच्या मनात विचारांचे कोणतेच वादळ घोंघावत नसेल तर गाईच्या माध्यमातून समृद्धीचा मार्ग असा विचारही आमच्या मनाला शिवू शकत नाही. cow India गाईला असलेले मातेचे स्थान अढळ आहे; ते कधीही बदलू शकत नाही. पण हीच माता आपली पालन पोषणकर्ती होत असेल तर तो दृष्टिकोन बाळगण्यास हरकत काय? गोसेवेच्या पुण्यासोबत जर आर्थिक संपन्नतेची दिशा स्पष्ट होत असेल भीमराज शर्मा यांनी दाखविलेल्या धाडसाचे कौतूकच व्हायला हवे. cow India दूध, खत आणि गोमूत्र यापुरतेच गोमातेला मर्यादित न ठेवता वैश्विक स्तरावर जर तिची कीर्ती जात असेल तर हाही आमच्या गोमातेचा सन्मानच आहे. कत्तलखान्याकडे जाणा-या गाईंचे ट्रक पकडून पोलिसांच्या स्वाधीन करणा-या गोमातेवर निस्सीम श्रद्धा असलेल्या तरुणांसाठी शर्मा यांचा प्रयोग कदाचित दिशा दाखविणारा ठरू शकेल, असे म्हणायला हरकत काय? cow India
९७६३७१३४१७