---Advertisement---

Dhule Crime News : शिंदखेडा पंचायत समितीत संतापजनक प्रकार , विस्तार अधिकाऱ्याने केली ग्रामसेविकेकडे शरीरसुखाची मागणी

by team
---Advertisement---

धुळे : महिला सुरक्षेतेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. अशात धुळे जिल्ह्यात एक धक्कादायक घडला आहे. याठिकाणी विस्तार अधिकाऱ्याने ग्रामसेविकेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान,  पीडित ग्रामसेविकेने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत त्या विस्तार अधिकाऱ्यास चोप देत काळे फसले आहे. याप्रकरणी संबंधित विस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरु आहे.

याबाबत माहिती अशी की,एस. के. सावकारे हे शिंदखेडा येथे  विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, त्यांनी येथील पीडित ग्रामसेविका महिलेचा  विनयभंग करत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. धक्कादायक म्हणजे हा प्रकार शिंदेखेडा पंचायत समितीत घडला. या घटनेनंतर पंचायत समितीत एकच खळबळ उडाली.

विस्तार अधिकार्‍याला फासले काळे
आपल्या सोबत घडलेल्या या प्रकाराबाबत पीडित ग्रामसेविकेने शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. हा प्रकार लक्षात येताच शिवसेना पदाधिकरी हे पीडित महिलेच्या मदतीला धावून आले . त्यानंतर संतप्त महिला ग्रामसेविका आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी विस्तार अधिकार्‍याला काळे फासत चांगलाच चोप दिला. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारवरुन विस्तार अधिकारी एस. के. सावकारेवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment