मनपा निवडणुकीत मविआ एकत्र; कुणाल पाटील यांचा दावा

धुळे : येथील मतदार संघात काँग्रेसला चागल्या प्रमाणात मत मिळाली आहेत. ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे. काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशी जबादारी असलेले कुणाल पाटील यांनी या मतदार संघावर दावा करताना म्हंटले आहे की, धुळे लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे प्राबल्य आहे त्यामुळे हा मतदार संघ काँग्रेल्सला मिळावा.

सद्य परिस्थितीत हा मतदार संघ उबाठा शिवसेना गटाकडे आहे. भारत जोडो यात्रेच्या वर्धापन दिनानिमित्ताने येथे काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. पक्ष फोडून सत्तेत येण्याचे भाजपचे धोरण आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. आंदोलकांवर लाठीमार केला जात आहे. लोकांमध्ये भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी कमालीचा रोष आहे. महागाई, बेरोजगारी यामुळे जनता मोदी सरकारला कंटाळली असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेमुळे धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूरमध्ये काँग्रेसचे संघटन आणि ताकद वाढली आहे. यामुळे महापालिका निवडणूक स्वबळावर नव्हे तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवून मनपात सत्ता स्थापन करु, असे त्यांनी सांगितले.