धुळे : धुळे-पारोळा महामार्गवरील अजंग गावानजीक कार पलटी होऊन झालेल्या अपघातात महिला ठार तर, दोघे जखमी झाल्याची घटना घडली.
याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात कारचालकाविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलाबाई वसंत पवार असे मृत महिलेचे नाव आहे.
कृष्णा बाजीराव भिल (वय २५, रा. अंचाडे, ता. जि. धुळे) याने दिलेल्या फिर्यादीवरून २० रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास मौजे अजंग रस्त्यावर प्रदीप वसंत पाटील (ता. धरणगाव, जि. जळगाव) कारममधून (क्रमांक एमएच ०४, ईएच-३९१३) कमलाबाई वसंत पवार (वय ६०, रा. धरणगाव, जि. जळगाव) यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते.
अचानक त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती उलटली. यात कमलाबाई पवार यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले दिलीप पवार व प्रदीप पाटील हे दोघेही जखमी झाले आहे.