Dhule News: धुलिवंदनाच्या दिवशी मद्य विक्री बंद

धुळे :  जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सीएल ३ (देशी दारू किरकोळ विक्री) अनुज्ञप्त्या, सीएल ३ (देशी दारू किरकोळ विक्री) अनुज्ञप्त्या, एफएल २ (विदेशी दारू सीलबंद बाटली किरकोळ विक्री) अनुज्ञप्ती, एफएल३ (परमीट रुम), सीएलएफएलटीओडी – ३ (देशी दारू सीलबंद बाटलीतून किरकोळ विक्री) अनुज्ञप्ती आणि एफएल / बिआर- २ (बिअर शॉपी), ताडी (टि.डी १) इत्यादी अनुज्ञप्त्या सोमवार २५ मार्च रोजी धूलिवंदनाच्या दिवशी पूर्ण दिवस बंद ठेवाव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत.

संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी वरील दिवशी मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या (दुकाने) उघडे ठेवू नयेत. तसेच विक्री व अन्य व्यवहार करू नयेत. बंदच्या दिवशी दुकाने (अनुज्ञप्ती) उघडी आढळल्यास त्यांची अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी गोयल यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे