---Advertisement---
---Advertisement---
नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने हिन्यांनी भरलेला ग्रह शोधून काढला आहे. शास्त्रज्ञांनी आतापर्यंत अंतराळात अशा अनेक गोष्टी शोधून काढल्या आहेत ज्या अतिशय आश्चर्यकारक आहेत. नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने हिन्ऱ्यांनी भरलेला ग्रह शोधून कमालच केली आहे. ५५ कॅन्क्री-ई हा ग्रह पृथ्वीपेक्षा पाच पट मोठा आहे. ५५ कॅन्क्री-ई या ग्रहाचे तापमान २४०० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. तसेच ५५ कॅन्क्री-ई हा ग्रह पृथ्वीपासून ४१ प्रकाशवर्ष दूर आहे.
अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने अंतराळात असे अनेक मोठे शोध लावले आहेत जे सर्वांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरले आहेत. जरा विचार करा, अंतराळात एक ग्रह आहे जो हिन्यांनी भरलेला आहे. असे आम्ही तुम्हाला सांगितले जर तर तुमचा विश्वास बसेल का? नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने हिन्यांनी भरलेला ग्रह शोधून काढला आहे. ५५ कॅन्क्री-ई आपल्या ताऱ्याची एक परिक्रमा अवघ्या १७तासांत पूर्ण करते.
ग्रहावरील वातावरण पृथ्वीपेक्षा वेगळे
५५ कॅन्क्री-ई असे या ग्रहाचे नाव असून तो सुपर अर्थ या श्रेणीत येतो. असे मानले जाते की याचा बहुतेक भाग हिरे आणि ग्रॅफाइट सारख्या कार्बन पदार्थांनी बनलेला आहे. नासाच्या ५५ म्हणण्यानुसार, कॅन्क्री-ईचे वातावरण पृथ्वीपेक्षा वेगळे आहे. याशिवाय आजूबाजूला एक खास प्रकारचे वातावरण असल्याचेही संकेत शास्त्रज्ञांनी दिले आहेत. हा ग्रह आपल्या ताऱ्याच्या अगदी जवळ आहे, ज्यामुळे त्याचे तापमान खूप जास्त आहे. ५५ कॅन्क्री-ई आपल्या ताऱ्याची एक परिक्रमा अवघ्या १७ तासांत पूर्ण करते. त्यामुळे या ग्रहाचे तापमान अंश सेल्सिअसपर्यंत २४०० पोहोचते.
ग्रहावर जीवन शक्य आहे का ?
जास्त उष्णतेमुळे ५५ कॅन्क्री-ई हा ग्रह वितळलेल्या लाव्हासारखा दिसतो ज्यामुळे जीवन अशक्य होते. मात्र, नुकत्याच झालेल्या कार्बनआधारित ग्रहांच्या शोधामुळे भविष्यासाठी नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. ५५ कॅन्क्री-ई या ग्रहावर अधिक सखोल संशोधन केल्यास भविष्यात त्याच्या मूलद्रव्यांचा उपयोग होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.