शिंदे गटाकडून मोठा मासा गळाला? ठाकरेंचे १६ तर काँग्रेसचे १० आमदारांचे प्रवेश चर्चेत, राजकीय वर्तुळात खळबळ

Mumbai: शिवसेना (शिंदे गटाची) २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईसह राज्यभर सदस्य नोंदणी सुरू करण्यात येणार आहे.  याबद्दलची  माहिती माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

शिंदेसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सोमवारी  पत्रकर परिषदेत घेत उद्धवसेनेचे १५ तर काँग्रेसचे १० आमदार आमच्या पक्षात प्रवेशासाठी इच्छुक आहेत आणि २३ जानेवारीला मोठा राजकीय भूकंप होईल, असा दावा केला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी वांद्रे कुर्ला संकुल येथे हा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. या वेळी महापालिकेवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ‘ती’ जायची परपुरुषासोबत; मुलीला जाग आली अन् महिलेचं कांड उघड

९ फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने पक्षाकडून २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या सदस्य नोंदणी मोहीम आणि मतदारांचे आभार मानण्यासाठी जिल्हानिहाय सभा होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

वांद्रे बीकेसी येथील मैदानावर २३ जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानिमित्त शिवसेनेच्या वतीने लाडक्या बहिणींना निमंत्रित केल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे १६ आमदार आणि काँग्रेसचे १० आमदार शिंदे गटात लवकरच प्रवेश करणार असून, काही खासदारही संपर्कात असल्याची माहिती त्यांनी दिली.