जामनेर : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे हे भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती. अखेर त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याप्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केल्याने या चर्चाना विराम मिळाला आहे.
दिलीप खोडपे हे आगामी विधानसभेत जामनेर मतदार संघातून निवडणूक लढवतील असे दिसून येत आहे. पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. शनिवारी दि. २१ सप्टेंबर रोजी जामनेर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला सर्व नेत्यांनी उपस्थिती लावलेली दिसून आली.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील, माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आ. अरुण पाटील, रावेर येथील श्रीराम दयाराम पाटील, अमळनेरचे माजी आमदार बी. एस. पाटील यांच्यासह जामनेर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.