---Advertisement---

Jalgaon News : पक्षप्रवेशावरून भाजपात नाराजीनाट्य ; काय म्हणाले आमदार भोळे ?

---Advertisement---

जळगाव : पक्ष वाढीसाठी तसेच मजबूतीसाठी पक्षाने नव्याने प्रवेश देणे गरजेचे आहे, परंतु आपल्याकडे पक्षात जुने कार्यकर्ते काम करून पक्षाला मोठे करीत आहेत त्यांचाही विचार व्हावा अशी विनंती आपण पक्षाचे नेते व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना करणार आहोत, असे मत आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केले.

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. शिवसेना उबाठा तसेच शिवसेना शिंदे गटातील काही माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत मुंबईत जोरदार हालचाली सुरू आहेत. प्रवेश करणारे काही नगरसेवक मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री व पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून आल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप नेते जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून हा प्रवेश होत आहे. मात्र या प्रवेशाला पक्षातीलच काही माजी नगरसेवक तसेच महापालिका निवडणूक लढणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा विरोध असल्याचे दिसून आले आहे.

आमदार भोळेंनी घेतला आढावा

आमदार सुरेश भोळे यांनी महापिालकेत सतरा मजली इमारतीतील तेराव्या मजल्यावरील आयुक्तांचा दालनात बैठक घेतली. त्यांनी महापिालकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. म्हाडाच्या घरबांधणी प्रस्तावाला मंजूरी देण्याबाबत नगररचना विभागाकडून मिाहती घेतली, तसेच महापालिकेतील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त रिक्त पदाबाबत मिाहती घेतली.

प्रवेशाला कार्यकर्त्यांचा आक्षेप

कार्यकर्त्यांनी या प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही पक्षासाठी वर्षानुवर्षे कार्य करीत आहोत, प्रभागातही आम्ही निवडणूकीची तयारी केली आहे. जनतेशी संपर्कही ठेवला आहे. आता पक्षात नव्याने प्रवेश करणाऱ्यांना महापिालकेत उमेदवारी देण्यात येईल. त्यामुळे आम्ही केवळ पक्षात कार्यच करत रहावयाचे काय? आम्हाला संधी केंव्हा मि ळणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे नवीन प्रवेश देण्याबाबत पक्षात नाराजी उघड झाली असल्याचेही दिसून आले आहे.

याबाबत आमदार सुरेश भोळे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, पक्ष वाढीसाठी तसेच बळकटीसाठी निश्चित नवीन लोक घेतली पाहीजेत, त्यांना पक्षात प्रवेश दिला पाहीजे. परंतु त्यांना पक्षात प्रवेश देतांना आपल्याकडे असलेल्या जुन्या कार्यकर्त्यांचा विचार करण्याची गरज आहे. जुन्या कार्यकर्त्यांनी मांडलेल्या व्यथा अगदी योग्य आहेत. त्यांची हीच व्यथा आपण पक्षाचे नेते व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---